Header Ads

डफळापूर | कोनतरी कोरोनाची भेट दिल्यावर जागे होणार काय ; पो.नि.राजाराम शेळके | सततच्या गर्दीवर पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल


डफळापूर | डफळापूरातील गर्दी धोकादायक आहे.सातत्याने गावातील काही दुकानदार मुख्य पेठेत गर्दी करत आहेत, 
हे बदलावे.कोरोनाचा संसर्ग कधी पसरेल यांची शाश्वती नाही,असे प्रतिपादन पोलिस निरिक्षक रामदास शेळके यांनी केले.
शेळके पुढे म्हणाले,गावातील पदाधिकाऱ्यांनी जागृत्त व्हावे.पोलीसांची कमी संख्या यामुळे प्रत्येक गावात दिवसभर लक्ष देण्यास मर्यादा आहेत.त्यामुळे गावातील ग्राम सुरक्षा दलाने गावची सुुुरक्षा,बाजारपेठेतील गर्दी,बाहेरून आलेल्या नागरिकावर लक्ष ठेवावे.मोठी बाजार पेठ असल्याने बाहेरून खरेदीसाठी येणाऱ्याची संख्या मोठी आहे.यामुळे कोणतेही नियम न पाळता दुकानदारांकडून सातत्याने गर्दी केली जात आहे.त्यांना त्यांच्या अटीची आठवण करून देत कठोर निर्णय घ्या,बाजारपेठत बाहेरून आलेला एकादा डफळापूरात कोरोना विषाणूची भेट देऊन जाईल,त्यावेळी सतर्कता बाळगून कायदा होणार नाही.संरपच,ग्रामपंचायतीचे अधिकारी,शासनाचे आदेशानुसार कारवाई करा,ग्रामसुरक्षा दलाकडून गावाची कोरोनापासून सुरक्षा बाळगावी,त्यापुढे कोण ऐकत नसेलतर आम्हाला कळवा,असेही आवाहन शेळके यांनी केले.संरपच बालिकाकी चव्हाण व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Blogger द्वारे प्रायोजित.