Header Ads

सांगली | अवकाळी पाऊस व गारपिटाचा फटका बसलेल्या द्राक्ष,बेदाणा,भाजीपाला व कलिंगड पिकाचे तात्काळ पंचनामे करा ; महेश खराडे

 सांगली,प्रतिनिधी : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे  द्राक्ष,बेदाणा,भाजीपाला व कालिगड पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,नुकसानग्रस्त शेती व बेदाणा शेडचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे
खराडे म्हणाले यंदाचे वर्ष शेतकऱ्याच्या साठी प्रचंड त्रास दायक गेले आहे प्रथम महापुरामुळे नदीकाठावरील ऊस शेती उध्वस्त झाली महापुरामुळे ऊस ,भाजीपाला, केळी,द्राक्ष शेतीचे दीड ते दोन हजार कोटींचे नुकसान झाले त्यानंतर अतिवृष्टीमुळे द्राक्ष शेतीचे दोन ते अडीच हजार कोटींचे नुकसान झाले संपूर्ण द्राक्ष पट्टा उध्वस्त झाला मिरज, तासगाव पलूस कवठेमहांकाळ जत या तालुक्यातील 30 ते 40 हजार अक्रवरील द्राक्ष शेती उध्वस्त झाली त्यातून शेतकरी बाहेर पडतोय न पडतोय तोच पुन्हा कोरोनाच्य संकटात दशेटकरी पुरता अडकला  लॉक डाउन मुळे संपूर्ण शेती माल विक्री ठप्प झाली कारोणाचे संकट सुरू असतानाच अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला 
गारपिटीमुळे तासगाव जत कवठेमहांकाळ पलूस सह सर्वच तालुक्यात गारपिटीमुळे द्राक्ष शेती व बेदाणा आणि भाजी पाला उत्पादक मोठ्याप्रमाणात अडचणीत सापडला अगोदरच कंबरडे मोडले ला शेतकरी आणखी गर्भ गळीत झाला आहे त्यामुळे गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे व नागज, आगलगव, दुधेभवी परिसरात असलेल्या बेदाणा शेदचे पंचनामे करून टी शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे
सध्या प्रशासन कोरोना क्या संकट निवारणासाठी झटत आहे त्यातूनही सवड काढून कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करून घेणे गरजेचे आहे तरी जिल्हा अधिकाऱ्यांनी यांप्रश्र्नी लक्ष घालून तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी खराडे यांनी केली आहे


Blogger द्वारे प्रायोजित.