Header Ads

जत | पोलिस ठाण्याकडून गुन्हे दडपण्याचे प्रकार ? | पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ



जत,प्रतिनिधी : जत पोलिस ठाण्यात दाखल गुन्हाची माहिती प्रसार माध्यमापासून लपविण्यात येत असल्याची चर्चा आहे.सायकांळी अनेक दैनिकाचे वार्ताहर पोलिस ठाण्याला फोन करत असतात.मात्र गेल्या काही दिवसापासून पत्रकारांनी केलेले फोन पोलिस ठाण्यात उचलले जात नसल्याचे काही पत्रकारांनी सांगितले.जत एकादे वेळा फोन उचललाच तर गुन्हा नोंद असला तरी नोंद नाही म्हणून फोन आपटून ठेवला जात आहे.असे अनुभव जत शहरातील अनेक पत्रकारांना आले आहेत.संचार बंदीत अल्पवयीन मुलीची  छेडछाड,राजरोसपणे दारू विक्रीसह अनेक गंभीर गुन्हे पोलीस ठाणे हद्दीत घडले आहेत.यातील अनेक गुन्ह्याची पोलीस दप्तरी नोंदीही झाल्या आहेत. तरीही नोंद गुन्ह्यांची माहिती न देण्या मागचे गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान पोलिस ठाण्याकडे आलेले अनेक गुन्हे मोठ्या आर्थिक तडजोडीने मिटविले जात असल्याची चर्चा आहे. त्यासाठी एका अधिकाऱ्यांने शहरासह तालुक्यात काही खास खाजगी माणसे नेमल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक तक्रारी दाखल होण्याअगोदर मिटविल्या जात असल्याचे समोर येत आहे.तर यांची माहिती विचारणाऱ्या फिर्यांदीना पोलीसाकडून दमबाजी,मारहाण करण्यात येत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे कोणही पुढे येत नाही.

 

 

संचारबंदीत तडजोडीही जोरात

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात अनेक घटना घडल्या आहेत.यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात गेल्याही आहेत.बेकायदा दारू विक्रीसह अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.मात्र यांचीही माहिती पत्रकारांच्या पासून लपविली जात असल्याची चर्चा आहे.

 

शालेय पोषण आहाराच्या एका प्रकरणात मोठी तडजोड ?

 

 

काही दिवसापुर्वी तालुक्यातील एका शाळेतील पोषण आहाराचे प्रकरण एका पोलीस अधिकाऱ्यांकडून मोठ्या आर्थिक तडजोडीतून मिटविल्याची चर्चा आहे.यातील महिलांना पोलीसाकडून दमबाजी केल्याची चर्चा आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.