Header Ads

एकुंडी | ग्रामपंचायत कडून सँनीटायझर व हँडवॉशचा वाटप


जत,प्रतिनिधी : जत (ता.जत) एकुंडी ग्रामपंचायत कडून हँड सँनीटायझर व हँडवॉशचे वाटप करण्यात आले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर खबरदारी म्हणून विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात देखील विविध उपाययोजनां ग्रामीण प्रशासनाकडून राबविले जात आहेत. एकुंडी ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन सर्व जनतेला सँनीटायझरचा वाटप केला आहे.

तालुक्यातील एकुंडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना सँनिटायझर, हँडवाश, साबन व मास्कचे वाटप करण्यात आले.येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच तथा जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी लॉकडाऊनमुळे शहरात जाता येत नसल्यामुळे येथिल ग्रामस्थांची अडचण ओळखून ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या वतीने या साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक व पदाधिका-यांनी घरोघर जाऊन वाटप केले.

यावेळी उपसरपंच सरोजिनी कोरे,ग्रामसेवक आर.के.माळी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

एकूंडी ता.जत येथे सँनिटायझर व हँडवाशचे वाटप करण्यात आले.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.