जत,प्रतिनिधी : जत शहराच्या चारी बाजूना कोरोना विषाणुचे वादळ घोघावत आहे.त्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोकण्यासाठी शहरात आजपासून पुढील चार दिवस 100 टक्के लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्याला पहिल्या दिवशी जतकरांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभला,रस्त्यावर एक चिटपाखरूही दिसत नव्हते.
लगतच्या कर्नाटकातील विजापूर,बेळगांव,सोलापूर,सांगली कोरोनाचा प्रभाव सातत्याने वाढत असल्याने जतला धोका निर्माण झाला आहे. कोरोना विषाणु संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आजपासून चार दिवस कडकडीत लॉकडाऊन सुरू झाला आहे.आज पहिल्या दिवशी प्रशासनातील अधिकारी,पोलीस वगळता रस्ते,गल्ली-बोळही लॉकडाऊन होती.जतकरांनी दिलेल्या प्रतिसादाला सलाम..!