Header Ads

बेळोडंगी | ग्रामपंचायतीकडून सँनिटायझर,पोत्साहन भत्याचे वाटप 






 

 

कोरोना संसर्गजन्य विषाणूपासून बचावासाठी बेळोडंगी ग्रामपंचायतकडून उपाययोजना राबविण्यात आले.औषध फवारणी,स्वच्छता व सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे.

या परिस्थितीत जीव धोक्यात घालून काम करणारे आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रूपयाचे पोत्साहन भत्त्याचे संरपच सौ.कल्पना बुरकुले,उपसपंच सुरेश हत्तळी,ग्रामसेवक सुरेश जगताप यांच्याहस्ते यांचे वाटप करण्यात आले.

गावातील 600 नागरिकांना सँनिटायझर व 14 वित्त आयोगातून 3 आशा वर्कर व 3 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात आले.डॉ.सुशांत बुरकुले,क्लार्क बाळू पुजारी व ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच कर्मचारी उपस्थिती होते.

 

बेळोडंगी ग्रामपंचायतीकडून सँनिटायझर,पोत्साहन भत्याचे वाटप करताना संरपच सौ.कल्पना बुरकुले,उपसपंच सुरेश हत्तळी,ग्रामसेवक सुरेश जगताप 




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.