Header Ads

कोरोना फेव्हर | डफळापूर पुन्हा कडकडीत बंद | पोलीस,ग्रामपंचायत अलर्ट | 25 स्वयंसेवक तैनात


डफळापूर | देशभर कोरोना विषाणु फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पो.नि.रामदास शेळके यांनी खडेबोल सुनावल्यानंतर 

डफळापूर ग्रामपंचायतीकडून संसर्ग रोकण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. काही अंशी ढिलाईचा व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेतल्याने पुन्हा कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.शुक्रवारी पुन्हा डफळापूरातील व्यापारी पेठा,चौक,रस्ते सुनसान झाले आहेत.

 

डफळापूर परिसरातील सुमारे 15 गावांची व्यापारी बाजारपेठ असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी पेठलाईनमध्ये होत होती.गर्दीची पाहणी पो.नि.शेळके यांनी गुरूवारी केली होती.त्यांनी कोरोनाचा प्रभाव रोकायचा असेलतर गर्दी हटवा,अन्यथा भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाईल अशा बैठक घेऊन सुचना दिल्या होत्या.

 

ग्रामपंचायतीने सर्व दुकानदारांसाठी सकाळी 9.00 ते 11.00 वाजेपर्यत वेळ ठरवून दिल्या आहेत.या काळातच दुकाने सुरू राहणार आहेत.मेडिकलही बंद ठेवण्यात आली आहेत.प्रा.आ.केंद्र, खाजगी चार दवाखाने सुरू आहेत.गावात सुमारे 25 वर स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.त्याचबरोबर सा.फौजदार शंकर पवार,ग्रामविकास अधिकारी एस.एस.कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक सतर्कता बाळगण्यात येत आहे.पदाधिकाऱी यासाठी राबत आहेत.  

Blogger द्वारे प्रायोजित.