डफळापूर | येथे छत्रपती शिवाजी महाराज व जगत् ज्योती श्री.बसवेश्वर यांच्या जंयतीनिमित्त मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांच्यावतीने गावात 500 मास्कचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणू रोकण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम गायकवाड यांच्याकडून राबविण्यात आला.माजी मुख्याध्यापक वसंत पाटील,रमेश शिंदे प्रमुख उपस्थित होते.गावातील वेगवेगळ्या भागात या मास्कचे वाटप करण्यात आले.