Header Ads

कोरोनाच्या लढाईत,आशाची परवड | लक्ष देणार कोन |

जत,प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिला जीवाची जोखीम पत्करून ऊन,वारा तहानभूक विसरून काम करत आहेत.त्यांच्या कामाचे महत्त्व आता शासन,प्रशासनाला पटले आहे.मात्र त्यांच्या तुटपुंज्या मानधनाकडे लक्ष कधी जाणार, गटप्रवर्तक महिला आशांची दुर्दशा कधी थांबणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.


कोरोनाने डोके वर काढल्यापासून आरोग्य यंत्रणा,प्रशासनाची धावपळ सुरू आहे.जिल्ह्यात 20 मार्चपासून आशा वर्कर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. कोरोना विरोधातील युद्धात हे सैन्यच सुरुवातीपासून आघाडीवर राहून काम करत आहेत.विदेशातून अन्य राज्यातून अन्य जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तिची माहिती घेणे व ती तात्काळ आरोग्य यंत्रणेला कळवणे त्यांना होम क्कारंटाईन करणे,त्यांच्या रोज घरी भेट देऊन माहिती घेणे, स्थानिक लोकापैंकी कोण आजारी असतील तर त्यांची माहिती आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याचे काम आशा वर्कर करत आहेत.त्यामध्ये गट प्रवर्तकांचे नियोजन रिर्पोटिग अतिशय महत्त्वाचे ठरत आहे.


 गटप्रवर्तकांना नाही प्रोत्साहन 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार आशा वर्करना 1 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळत आहे गटप्रवर्तकांना या प्रोत्साहन भत्तातून वगळले आहे,मात्र त्यामागे काहीच कारण दिसून येत नाही.शासन विसरले असावे एवढेच कारण दिसत आहे. गटप्रवर्तक महिलांनाही प्रोत्साहन भत्ता मिळणे आवश्यक आहे .


दोन हजारांची नुसतीच घोषणा


आशा वर्कर यांना तेलंगणा केरळमध्ये 7 हजार 500 रुपये मानधन मिळते,महाराष्ट्र राज्य शासनाकडून काहीच मानधन मिळत नाही.केंद्र शासनाकडून 2 हजार रुपये मानधन मिळते. राज्य शासनाने 2 हजार रुपये मानधनाची घोषणा केली आहे,मात्र ती केवळ घोषणाच ठरली आहे.


आशा गटप्रवर्तक...
एक द्दष्टीक्षेप 


1) महाराष्ट्रातील एकूण आशा वर्कर 73 हजार 
2) महाराष्ट्रातील गटप्रवर्तक 3 हजार 500
3) सांगली जिल्ह्यातील आशा वर्कर 2 हजार 55
4) सांगली जिल्ह्यातील गटप्रवर्तक 97
5) आशांना 2 हजार रुपये मानधन व कामावर आधारित मोबदला 
6) गटप्रवर्तक यांना 300 रुपये दैनिक भत्ता प्रवास भत्ता 25 असे मिळून 8,475


 


आशा वर्कर यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना ग्रिटींग कार्ड दिले


Blogger द्वारे प्रायोजित.