Header Ads

कोरोना | जत,संखमध्ये ड्रोनद्वारे निगरानी | बंदच्या चार दिवसा शहरात पोलीसाचा तीसरा डोळा काम करणार |


 






जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात नागरिकांच्यावर नजर ठेवण्यासाठी पोलीसाच्याकडून ड्रोनद्वारे निगराणी करण्यात आली.

देशात लॉकडाऊन काळातही नागरिक रस्त्यावर,चौकात फिरत आहेत.त्यामुळे धोका वाढला आहे.पोलीसांकडून याला प्रतिबंध करण्यासाठी थेट ड्रोनद्वारे आकाशातून टेहाळणी करण्यात आली. जत शहर व संख गावातील प्रमुख चौक,रस्ते,सार्वजनिक ठिकाणे,घराचे छताची कँमेरा ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आली.जत शहरात पो.नि.राजाराम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जत शहरात येत्या चार दिवस जनता कर्फ्यूमध्ये चार दिवस कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 'स्टे होम' चा पर्याय निवडण्यात आला आहे.या ड्रोनद्वारे पाहणी करून विनाकारण फिरणारे,सोशल डिस्टन्सिंग मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.संखमध्ये उमदीचे सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांनी नियोजन केले.

 


 

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू केली आहे. तरी नागरिक करोनाचा धोका गांभीर्याने घेत नसल्याने विनाकारण घराबाहेर पडत असून, दुचाकीवर शहरातून मुक्त संचार करत आहे. त्यामुळे शहर पोलीस अशा नागरिकांवर ड्रोनद्वारे नजर ठेवणार आहे. 


लगतच्या जिल्ह्यात करोनाचे रुग्ण 
मोठ्या प्रमाणात आढळले आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सुचना प्रशासन वेळोवेळी करत आहेत. तरी काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहे. तीन दिवसांपूर्वी नागरिकांनी भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र सर्वांनी पाहिले. पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या, संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यावर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहे. परंतु, काही टवाळखोर पोलिसांची नजर चुकवून घराबाहेर पडत आहे. अशा नागरिकांवर आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. ड्रोनच्या नजरेत आलेल्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

 

 

जत शहरात निगराणी ठेवणारे ड्रोन कँमेरा युनिट

 




 


Blogger द्वारे प्रायोजित.