Header Ads

दुधेभावीत एक कोरोना पॉझिटिव्ह | सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या चारवर | जतेत अलर्ट




 

सांगली : शिराळा वाळव्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथील एका 40 तरूण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.तो मुंबई येथून आला होता.त्याचे मुळ गाव वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी असून तो दुधेबावी येथे आपल्या मामाकडे आला होता. 


कोरोना स्वाब तपासणीत हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट सांयकाळी प्राप्त झाल्याची माहिती

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांनी दिली.

 

दरम्यान जतजवळच्या बेवनूर,धावडवाडी,गुळवंची,प्रतापपूर लगत हे दुधेभावी हे गाव येत असल्याने जत तालुक्यातही भितीचे वातावरण पसरले आहे.

 

सध्या जत नगरपरिषेदेने पाच दिवसाचा बंद पाळला आहे.मात्र काही अत्यावश्यक अस्थापने दिवसभर चालू आहेत.त्यांच्या वेळा कमी कराव्यात अशी मागणी नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर व उपनगराध्यक्ष आप्पा पवार यांनी तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे केली आहे.जत शहरासह तालुक्यात सतर्कता बाळगण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसापासून निम्मा जत तालुका लॉकडाऊन करण्यात आला आहे.

 

दरम्यान तरूणांच्या संपर्कातील निकटवर्तीय धोकादायक संपर्क बाधितांना मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येत आहे तर दुय्यम संपर्क बाधितांना कवठेमहांकाळ येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.दुधेभावी गाव सील करण्यात आले आहे.




Blogger द्वारे प्रायोजित.