जत | डोक्यात झाड पडून जतचा एकजण ठार

जत,प्रतिनिधी : देवनाळ ता.जत येथे वाळलेले नारळाचे झाड डोक्यात पडल्याने तुकाराम नामदेव बाबर (वय 52,रा.रामरावनगर जत)हे जागीच ठार झाले.घटना गुरूवारी सायकांळी सहाच्या सुमारास घडली.याबाबत जत पोलीसात नोंद झाली आहे.पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, देवनाळ रोडवरील धानाप्पा ऐनापुरे यांच्या शेतातील वाळलेल्या नारळाचे झाड तोडण्याचे काम सुरू होते.तुकाराम हे बाजूला उभे होते.दरम्यान नारळाचे झाड लगतच्या विजेच्या तारेवर पडून फिरल्याने शेजारी उभे असलेल्या तुकाराम यांच्या थेट डोक्यात पडले.त्यात त्यांचा जागीच मुत्यू झाला. तुकाराम बाबर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.मनमिळावू असणाऱ्या तुकाराम बाबर यांच्या निधनाने रामराव नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.