Header Ads

निगडी बुद्रुक | पोलीस पथकावर जमावाकडून हल्ला | चार जणाविरोधात गुन्हा दाखल


 

माडग्याळ,वार्ताहर : निगडी बुद्रुक येथील लमाणतांडा (ता.जत)येथे दोन गटातील हाणामारी नियंत्रीत करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचा-यांच्यावर जमावाने दगडफेक केल्याने एका महिला कर्मचाऱ्यासह तिघे पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7 च्या दरम्यान घडली.याप्रकरणी उमदी पोलीसांनी चार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत उमदी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि,निगडी बुद्रूक येथिल लमाणतांडा येथे बुधवारी संध्याकाळी महिलांच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारीची घटना घडत असल्याची बातमी निगडी बु.चे पोलीस पाटील यांनी उमदी पोलिस ठाणेस माहिती दिली.माहिती मिळताच  उपनिरीक्षक श्री.दांडगे,स्ट्राइकिंग फोर्ससह घटनास्थळी पोहोचले.घटनास्थळी दोन गट भिडले होते.त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करीत असताना त्यांनी पोलिसांवर दगड फेक करण्यास सुरुवात केली.या दगडफेकीमध्ये उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संभाजी करांडे,पो.काॅ. दिपक योचीवले,महिला पोलीस शिपाई सुनीता कांबळे यांना डोके व पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.याप्रंसगी उमदी पोलिसांनी चार अज्ञात आरोपींच्या विरोधात बेकायदा जमाव करणे,शासकीय कामात अडथळा,पोलीसावर हल्ला करणे,आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.संशयित अरोपीचा शोध सुरू आहे.अधिक तपास सपोनी दत्तात्रय कोळेकर व पोलिस उपनिरीक्षक दांडगे हे करीत आहेत.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.