Header Ads

जत | शहरातील मार्गासाठी रास्तारोकोचा इशारा | माजी आमदार विलासराव जगताप यांचे निवेदन | नियमबाह्य काम होऊ देणार नाही








जत,प्रतिनिधी : जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे काम निकृष्ठ व नियमबाह्य केले जात आहे. मुख्य मोजणी सोडून मार्गाचे रूंदीकरण कमी केले आहे. त्यासंदर्भात वारवांर संबंधित विभागाला सुचना देऊनही कामात बद्दल केला जात नाही.यापुढे बद्दल न झाल्यास आमच्या स्टाईलने आंदोलन करू असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिला आहे. तसे निवेदन त्यांनी संबधित यंत्रणेला दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,या कामाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे.त्यामुळे यामध्ये काहीतरी संशयास्पद अशी अर्थपुर्ण देवाणघेवाण असल्याचा संशय येत आहे. जत शहारामध्ये शासकीय राष्ट्रीय महामार्गाच्या नियमावली नुसार रस्ता व्हावा व खालील सुचनाची अंमलबजावणी व्हावी,जत शहरामध्ये रस्त्याची एकूण रुंदी आपण दिलेल्या माहीती नुसार 24 मीटर आहे. त्याप्रमाणेच आपण यापुर्वी मार्कींग केलेप्रमाणे मार्कीग कायम करावे. वरचेवर मार्कींग बदलून वातावरण संशयास्पद करु नये.रस्त्यामध्ये दुभाजक (डिव्हॉडर) ठेवावा.रस्त्याची काँक्रीट रुंदी नियमानुसार ठेवावी.रस्त्यालगत गटर व फूटपाथची व्यवस्था करावी.तूर्तास काँक्रीट केलेल्या रस्त्यावर भेगा(क्रॅक) पडलेल्या आहेत.त्या त्वरीत दुरुस्त कराव्यात व ध्रुव कन्स्टलन्सी एजन्सी,मुंबई कडून रक्कम वसूल करावी.बिरनाळ जवळचे वळण काढून त्या ठिकाणी पूलाचे काम त्वरीत सुरु करावे. त्याठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण बंद आहे.कुची रेल्वे क्रॉसींगजवळ पूलाचे डीझाईन त्वरीत करावे व कामाला सुरुवात करावी.पूल केल्याशिवाय राष्ट्रीय

महामार्गाचा उद्देश सफल होणार नाही याची आपणाला कल्पना असेल असे वाटते.अनेक ठिकाणी रस्त्याचे काम थांबलेले आहे. ते त्वरीत सुरु करावे.जमीन संपादन करुन संबधीतांना मोबदला दयावा.ध्रुव कन्स्टलन्सी एजन्सी,मुंबईवर कारवाई करावी. आपण त्याकडे मुददाम दुर्लक्ष केले आहे. तसे न करता कर्तव्याचे पालन करावे. शासकीय नुकसान टाळावे. या व इतर अनेक कारणांनी रस्ता वेळेत होत नाही. याकडे आपले लक्ष अजीबात नाही.तरी वरील सर्व बाबीकडे आपण स्वतः लक्ष दयावे व पाठविलेल्या पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य दाखवावे. तसेच नियमाप्रमाणे रस्ता सुरु करावा अन्यथा रस्त्याचे काम बंद करावे किंवा आम्हाला रस्ता बंद करावा लागेल.या हायवे रस्त्यावर गुणवत्ता व नियमाप्रमाणे काम करणारे मक्तेदारावर तपासणी करण्यासाठी ध्रुव कन्स्लटन्सी सर्व्हीसेस, मुंबई यांची शासनाने मोठी रक्कम देऊन नेमणूक केली आहे. सदरची एजन्सी काहीही सुपरव्हीजन करत नाही. कामावर केव्हाही येत नाही. त्यामुळे रस्त्यावर भेगा पडल्या आहेत त्याची जबाबदारी ध्रुव एजन्सी,मुंबई वर निश्चीत करावी व रस्त्यावरील चुकीच्या नियमाची मनमानी थांबवावी.दुष्काळी तालुके जोडणा-या या रस्त्यावर आपण स्वतः लक्ष देऊन वरील होणा-या चूका दुरुस्त कराव्यात व शासनाचा पैसा वाया जाऊ नये याची आपण स्वतः दक्षता घ्यावी. तसेच रस्ता हा नियमाप्रमाणे सरळ करावा व रस्त्याची रुंदी कमी करणेत येवू नये. अन्यथा रस्ता रोको करून भ्रष्टाचार बाहेर काढावा लागेल.अधिक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता,उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर यांना हे निवेदन दिले आहे.

 






 


Blogger द्वारे प्रायोजित.