Header Ads

'करोना' | जत शहरातील खाजगी डॉक्टरांची बैठक


 

 

जत,प्रतिनिधी : राज्य भरात वाढलेल्या 'करोना'पार्श्वभूमीवर जत शहरातील खाजगी डॉक्टरांची बैठक संपन्न झाली.

यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत,प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर,डॉ.मनोहर मोदी,डॉ.शरद पवार,डॉ.रोहन मोदी,डॉ.राजेश सकटे व शहरातील डॉक्टर्स उपस्थित होते.

आ.सांवत म्हणाले,तालुक्यातील कामानिनित्त राज्यभरात असलेले लोक तालुक्यात परत येत आहेत.त्यामुळे तालुक्यातील खाजगी डॉक्टरांनी सतर्कता बाळगाव्यात.तालुक्यातील बाहेरील गावातून तालुक्यात येणाऱ्या लोक कोरोना व्हायरस प्रभावित भागातून येत आहेत.ते उपचारासाठी खाजगी रुग्णालयात येण्याची शक्यता आहे.थंड,ताप सारखे आजारही गांर्भिर्यांने घेऊ नका.तशा रुग्णांना उपचार करूनही आजार बरा होत नसल्यास सरकारी आरोग्य यंत्रणांना माहिती द्यावी,असे आवाहन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.

प्रांताधिकारी प्रंशात आवटे म्हणाले,जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव नाही.मात्र बाहेरून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याची खबरदारी घेण्याची गरज आहे.राज्यभरात करोनोचा प्रभाव वाढत असल्याने आपल्या तालुक्यातील नागरिक तालुक्यात परतत आहेत.त्यांच्या वर शासकीय आरोग्य यंत्रणाकडून लक्ष ठेवले जात आहे.तरीही एकादा सर्दी,खोकला,तापासारखे आजार आटोक्यात येत नसल्यास अशा रूग्णांनी माहिती प्रशासनाला द्याव्यात.

डॉ.संजय बंडगर म्हणाले,आम्ही तालुक्यातील सर्व यंत्रणावरून लक्ष ठेऊन आहोत.ग्रामीण रूग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रात सर्व यंत्रणा सज्ज आहेत.तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची माहिती आशा वर्कर्स,आरोग्य कर्मचाऱ्याकडून गोळा केली जात आहे.तरीही काही नागरिक खाजगी रुग्णालयात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी संशस्पाद वाटल्यास तात्काळ आम्हाला माहिती द्यावी.त्यासाठी वॉटस्अप ग्रुप काढण्यात येणार आहे. त्यात खाजगी डॉक्टरांनी रुग्णांच्या माहिती टाकाव्यात.

 

 

जत तहसील कार्यालयातील बैठकीत बोलताना आ.विक्रमसिंह सांवत
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.