जत | वाहन खरेदी व विक्री संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बाजी केंगार
जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटनेच्या जत तालुक्याच्या अध्यक्षपदी बाजी केंगार यांची निवड करण्यात आली.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी याच्याहस्ते केंगार यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी खरेदी विक्री  संघटनेचे सागंली जिल्हा अध्यक्ष अशोक बंडगर,जिल्हा सचिव अरविंद कासार,जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने, शौकत नदाफ,श्रीनिवास सकंपाळ,आबा वाकळे,गोटू माळवदे,रवि मानवर,अशोक पाटील,खंडू पाटील व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

निवडीनंतर बाजी केंगार म्हणाले,वाहन खरेदी विक्रीची विश्वार्हता टिकवत,ग्राहकांसह विक्रेत्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू.