Header Ads

जत | मध्ये लायन्सची जनजागृती मोहीम


जत,प्रतिनिधी : लायन्स क्लब हा जत तालुक्यामध्ये गेली वीस वर्षे आरोग्यविषयक विविध कार्यक्रम घेत असतो. दरवर्षी आरोग्य तपासणी शिबीर व व्याख्याने,मोफत औषधोपचार वाटप असे अनेक कार्यक्रम राबवीत असतात.देशामध्ये आलेल्या कोरोना या संसर्गजन्य रोगाविषयी अनेक उलट-सुलट चर्चा व अफवा पसरविण्याचे काम काही लोक करीत आहेत, म्हणून लायन्स क्लबने जनजागृती मोहीम हाती घेतली असल्याचे लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनकर पतंगे यांनी सांगितले.जत येथील कोरोना विषाणूबद्दल जनजागृती कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे.त्यातील एक भाग म्हणून भगिनी निवेदिता जत येथे लायन्स क्लबतर्फे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ.एस.बी.शेख यांनी कोरोना व्हायरसबद्दल भीती न बाळगता,योग्य ती काळजी घेतली तर कोणताही धोका नाही,असे सांगितले.

Blogger द्वारे प्रायोजित.