Header Ads

जतेत पुठ्ठा गोडाऊनला आग | लाखोचे नुकसान | घटनास्थळी मोठी गर्दी,पोलीसांनी लोकांना हटविले


 

जत,प्रतिनिधी : जत शहरातील मध्यवर्ती भागातील पुठ्ठा गोडाऊनला अचानक आग लागून लाखोचे नुकसान झाले.घटना शनीवारी रात्री साडेआठच्या दरम्यान घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,शहरातील सावंत गल्लीत स्टेट बँकेच्या पाठीमागे असणाऱ्या पुठ्ठा गोडाऊनला अचानक आग लागली.बघता बघता आगीने गोडाऊनला भस्मसात केले आहे.घटनास्थळी पोलिस व अग्निशामक यंत्रणा दाखल झाली आहे.दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती.पोलीसांनी गर्दीला हटविले आहे.आगीचे नेमके कारण व नुकसानीची नेमकी माहिती मिळू शकली नाही.

Blogger द्वारे प्रायोजित.