Header Ads

कोरोना | इस्लामपूरमधील बाधित कुंटुबियाच्या संपर्क केल्याच्या संशयावरून खळबळ | आरोग्य यंत्रणाकडून खबरदारी


डफळापूर, वार्ताहर : इस्लामपूरच्या कोरोना बधित रुग्णाच्या डफळापूरातील एकजण संपर्कात आल्याच्या संशयावरून खळबळ उडाली आहे.या भितीने शुक्रवारी गाव ठणठणीत बंद झाले होते.दरम्यान आरोग्य यंत्रणांनी संबधित कुंटुबाची माहिती घेतली असून आम्हचे इस्लामपुरमध्ये कोणतेही नातेवाईक नसल्याचे व आम्हीही तिकडे गेलो,किंवा आमच्याकडे कोन आले नसल्याचे कुंटुबियांनी यंत्रणांना सांगितल्याचे समोर आले आहे.

इस्लामपूरात कोरोनाच्या बाधित रुग्णाच्या जत तालुक्यातील डफळापूर येथील एकजण आल्याचा संशयावरून गाव स्वंयपुर्तीने कडकडीत बंद झाले आहे.गावातील त्या संशयित नागरिकांची व त्यांच्या कुंटुबियाची माहिती आरोग्य विभागाने घेतली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी त्यावर्ती लक्ष ठेऊन आहेत.दरम्यान कुंटुबियाकडून इस्लामपुरात आमचे कोण नातेवाईक नसल्याचे सांगितले आहे.त्यामुळे आमचा कोणाशी संपर्क झाला नाही अशी माहिती आरोग्य यंत्रणा,पोलीसांना दिली आहे.त्याचबरोबर अंकले येथे कतारहून आलेल्या एका नागरिकांचे होम क्वॉरंटाईनचे 14 दिवसाचा कालावधी संपला आहे.पुढे ही त्यांना एकवीस दिवसापर्यत होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे.पुढे वरिष्ठ विभागाच्या आदेशावरून कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणाकडून सांगण्यात आले.दरम्यान डफळापूर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.आरोग्य यंत्रणा दक्ष झाल्या आहेत.

Blogger द्वारे प्रायोजित.