Header Ads

कोरोना | सोन्याळमध्ये निर्जंतुकीसाठी औषध फवारणी | कोरोना रोखण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन ; संरपच निवर्गी


सोन्याळ,वार्ताहर : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जत तालुक्यातील सोन्याळ ग्रामपंचायत येथे सरपंच संगीता निवर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना जनजागृती ग्रामस्तरीय समिती स्थापना करण्यात आली. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली.कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी सोन्याळ ग्रामपंचायत सतर्क झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण गावांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. गावातील गर्दीची ठिकाणे, गांधी पुतळा परिसर, ग्रामपंचायत परिसर, प्रमुख देवालया समोर,  विविध प्रमुख रस्ते, चौक आदी ठिकाणी सोडियम हायड्रोक्लोरिक  औषध ट्रॅक्टरच्या साहाय्याने फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले.यावेळी सरपंच संगीता निवर्गी, माजी ग्रामपंचायत सदस्य जकप्पा निवर्गी, ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार बगली, काडसिद्ध काराजनगी, हणमंत पुजारी,सैफद्दिन नदाफ, पंचू काराजनगी, ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार,तलाठी नूतन मोहकर ,आरोग्य सेविका धानेश्वरी हेगडे, व आशासेविका उपस्थित होते.ग्रामपंचायतचे क्लार्क अशोक ऐवळे, डाटा ऑपरेटर कविता होनमोरे, ग्रामपंचायत शिपाई बिरप्पा पुजारी, कोतवाल संतोष  मडीवाळ यांनी निर्जंतुकीकरण फवारणीच्या कामामध्ये सहभाग घेतला.गावातील ग्रामस्थांनी लॉकडाऊनच्या काळात घरीच बसावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावे असे आवाहन सरपंच संगीता जक्कु निवर्गी यांनी केले आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.