Header Ads

कोरोना बंद : काहींनी बंदचा आदेश झुगारला | जत शहर : कडक कारवाई करण्याची गरज |






 

जत,प्रतिनिधी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जत तालुका प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.याच पार्श्वभूमीवर 31 मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे आदेश प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी काढले आहेत. या आदेशान्वये खासगी ऑफिस,शोरूम आणि दुकाने बंद राहणार आहे. मात्र, यादरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये, छोटे रेस्टॉरंट सुरु राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र शुक्रवारी ता.20 रोजी ग्रामीण भागातील काही गावात बंद होता मात्र जत शहरात कोरोना  : काहींनी बंदचा आदेश झुगारला, कडक कारवाई करण्याची गरज जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, बार, रेस्टॉरेन्ट, क्लब, देशी दारूची दुकाने, शॉपिंग मॉल, पानठेले यासह अन्य दुकाने (अत्यावश्यक वस्तू वगळता) 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेशानंतरही काहींनी हा आदेश झुगारून हॉटेल्स, नास्ता, चहा, लिंबूपाणी, उसाचा रस, पान व माव्याची दुकाने सुरू ठेवली होती.त्यामुळे शहरात दिवसभर भितीचे वातावरण होते.नगरपरिषदेनी सर्वांना नोटीसा देऊनही आदेशाला दुकानदारांनी हारताळ फासला होता.ही बेजबाबदार कृती संपूर्ण समाजाला संकटात ओढणारी आहे. त्यामुळे अशा कोरोना वाहकांवर तातडीने कडक कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शहरभर गस्त घातली तरच, हे शक्य होणार आहे.

तालुक्यातील सोने-चांदीची दुकाने, कापड, अ‍ॅटोमोबाईल, भांड्याची दुकाने, इलेक्ट्रीक-इलेक्ट्रॉनिक्स, टिंबर, प्लायवूड व इतर दुकाने (जीवनाश्यक वस्तू, किराणा दुकान, औषधे, फळे, भाजी वगळून) 20 मार्च ते 31 मार्च 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे़ या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्याविरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही 
प्रांताधिकारी यांनी सांगितले.पुढे आर्थिक संकट उद्भवेल, याचा मुकाबला कसा करायचा यावर उपाययोजना सुरु असल्याचेही प्रांताधिकारी यांनी सांगितले़.दरम्यान जत एसटी आगाराच्या खबरदारी घेत लांब पल्याच्या व अन्य काही मार्गावरील एसटी बंद केल्याने स्टँडमध्ये मोठ्या प्रमाणात बसेस थांबून होत्या.

 

 

जत शहरात बंदच्या नोटीसा देऊनही गुरुवारी दिवसभर मंगळवार बाजारपेठ समिश्र बंद पाळला.लांब पल्याच्या एसटी बसेस मात्र पूर्णत:बंद केल्याने स्टँडमध्ये बसेस थांबून होत्या.





 


Blogger द्वारे प्रायोजित.