Header Ads

जत | कामगार सेनेच्या वतीने जत एसटी डेपोत रूमालचे वाटप


 




जत,प्रतिनिधी : कामगार सेना व लायन्स क्लब जत तालुक्यांच्या वतीने एसटी कामगारांना रुमालाचे वाटप करण्यात आले.सध्या जगभरात अतिभयंकर कोरोनो विषाणू ने मानवजातीवर महासंकट ओढवले आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जत एसटी आगारात कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून महाराष्ट्र कामगार सेना व लायन्स क्लब जत यांच्या कडून एस टी तील अधिकारी वर्ग , चालक,वाहक,हेल्पर व काही प्रवासी असे सर्वांना मिळून सुमारे दिडशे पांढरे शुभ्र रुमाल वाटप करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र कामगार सेना राज्य उपाध्यक्ष व लायन्स क्लब अध्यक्ष दिनकर पतंगे,लायन्स क्लब रिजनल चेअरमन राजेन्द्र आरळी,विभाग नियंत्रक ताम्हणकर,आगार व्यवस्थापक विरेंद्र होनराव,आगारप्रमुख महेश जाधव,सेनेचे कामगार प्रतिनिधी पी.टी.मदने, क. बहिणाबाई चौधरी ट्रस्ट जत अध्यक्ष राजू सावंत,जत शहर युवासेना उपाध्यक्ष विक्रम पाचंगे, युवासेना कार्यकर्ते अमित शिंदे, मोसीन नदाफ,एस टी आगारातील विलास शिंदे,महेश पाटील,पोपट शिंदे, बळी यादव,प्रदीप खरात,दिलीप कोरे व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.अविनाश कोकरे यांनी सर्वांचे आभार मानले.

 

जत एसटी डेपोत रूमालाचे वाटप करण्यात आले.




 


Blogger द्वारे प्रायोजित.