Header Ads

बालगाव | जत पुर्व भागातील आठवडे बाजार बंद |


 
 

बालगाव,वार्ताहर : कोरोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून बालगाव,उमदी,संखसह पुर्व भागातील सर्व गावाचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गावांच्या आठवडा बाजार आसपासच्या परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थ येतात.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची परिपत्रकानुसार कोरोना विषाणूच्या उपाय योजना अंतर्गत पुर्व भागातील सर्वच गावातील आठवडे बाजार 31 मार्च पर्यत बंद राहणार आहे.त्याशिवाय खबरदारी म्हणून सर्व उघड्यावर विक्री करणारे हॉटेल दुकाने बंद राहतील.ग्रामस्थाने स्वतःची काळजी घ्यावी,बाहेरून आलेल्या लोकांना प्रथम आरोग्य केंद्र कडे पाठवून घ्या नंतरच राहत्या घरी कुटुंबामधील सामील करून घ्यावे सहकार्य करावे असेही आवाहन ग्रामपंचायतीनी केले आहे.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.