Header Ads

मुंबई | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे अडचणी तात्काळ सोडवा


 

 

 

मुंबई : राज्यात सुरू झालेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 21 लाख 82 हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी सहकार विभागाने प्रसिद्ध केली. या यादीतील शेतकऱ्यांनाही व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तातडीने सोडविण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.आत्तापर्यंत 1 लाख 25 हजार 449 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले, असून उद्या रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होतील अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिली प्रायोगिक तत्वावरील यादी 24 फेब्रुवारी रोजी लावण्यात आली होती.त्यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

 
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.