Header Ads

जत | सुधारीत जाहिरात काढून धनगर व वंजारी समाजाला न्याय द्यावा | रासपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन






सुधारीत जाहिरात काढून धनगर व वंजारी समाजाला न्याय द्यावा

 

रासपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक गट-ब पदाच्या भरती प्रक्रियेत (एन.टी-क) व (एन.टी-ड) अर्थात धनगर व वंजारी प्रवर्गातील विद्यार्थ्यावरील झालेला अन्याय दूर करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सांगली येथे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी रासपचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष अजित पाटील, सांगली लोकसभा अध्यक्ष महेश मासाळ, युवक आघाडीचे सांगली शहराध्यक्ष प्रमोद सरगर तसेच यावेळी जतचे माजी आमदार विलासराव जगताप, जत पंचायत समितीचे सभापती मनोज जगताप, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य तम्माणगौडा रवीपाटील, भाजप जत तालुकाध्यक्ष सुनिल पवार, जत नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय ताड, नगरसेवक प्रकाश माने, संतोष मोटे, आप्पा शिंदे, संग्राम जगताप, संजय गावडे आदी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब साठी 2020 ची जाहिराती क्र:05/20 प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक गट-ब अराजपत्रित पदाच्या 650 जागांची भरती करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एकूण 650 जागा पैकी 475 जागा विविध प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. परंतु शासन निर्णयाप्रमाणे भ.ज-क (धनगर) प्रवर्गासाठी सरळ सेवा भरतीसाठी 3.5 टक्के जागा आरक्षित असताना केवळ 2 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. प्रत्येक्षात 22 जागा आरक्षित असायला हव्या होत्या. तसेच भ.ज-ड (वंजारी) प्रवर्गासाठी सरळ सेवा भरतीसाठी 2 टक्के जागा आरक्षित असताना एकही जागा आरक्षित दाखवली नाही. त्यामुळे या परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाची लाट तयार झाली आहे. भ.ज-क व भ.ज-ड प्रवर्गातील उमेदवारांवर आन्याय झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सहनुभूतीपूर्वक विचार करून तातडीने या जाहिरातीस स्थगिती करून योग्य तो बदल करून नविन जाहिरात प्रसिध्द करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

 

राज्य लोकसेवा आयोगाने सुधारीत जाहिरात काढून धनगर व वंजारी समाजाला न्याय द्यावा,या मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवदेन देताना 




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.