Header Ads

काष्ट्राईब' हे नांव इंगळे यांच्याशिवाय दुसऱ्यानी वापरू नये; गणेश मडावी


 




'काष्ट्राईब' हे नांव इंगळे यांच्याशिवाय दुसऱ्यानी वापरू नये; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा

 

 

सोन्याळ,वार्ताहर : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ ही राज्यातील मागासवर्गीयांच्या प्रश्नांबाबत गेल्या 38 वर्षांपासून  प्रामाणिकपणाने प्रयत्न करणारी एकमेव आणि खरी संघटना असून कास्ट्राईब हे नांव फक्त कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखालील कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य हेच वापरतील असा निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सन 2015 व 2019 मध्ये दिलेला असताना काही बोगस संघटनांकडून "कास्ट्राईब" या नावाचा वापर चालू आहे.त्यांच्यावर न्यायालयाच्या निर्णयानुसार रीतसर  कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी बैठकीत दिली आहे.

दि.27/2/2001 शासन पत्रान्वये  कास्ट्राईब या नावाचा वापर करून काही संघटनानी शासनाच्या यादीत स्थान मिळवले आहे. ह्या संघटना मान्यता प्राप्त नसुनही बेकायदेशीररित्या काष्ट्राईब या नावाचा वापर केला जात आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने  दिलेल्या आदेशामध्ये कृष्णा इंगळे यांच्या संघटनेशिवाय इतर कोणत्याही संघटनेला काष्ट्राईब हे नाव वापरणेस मनाई केली आहे.तरी सुद्धा काही बोगस संघटनानी संघटनेचे नाव वापरून गैरप्रकाराने वागत असल्याचे दिसून आले आहे. जर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अशा बोगस संघटनाकडून अवमान केला तर अशा संघटनांविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई केली जाईल,असा इशारा काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी दिला आहे. यावेळी जि. प कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद लांडगे, विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब व्हनखडे, जिल्हा सचिव बाबासाहेब माने, उपाध्यक्ष धनंजय गाढे, उपाध्यक्ष अरुण मोरे, शिवाजी जोशी, रमेश सोनवणे, कोषाध्यक्ष सुलोचना खंदारे, उपाध्यक्ष दीपक बनसोडे, विजयकुमार सोनवणे, शिक्षक संघटना विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे,उपाध्यक्ष लखन होनमोरे, विद्याधर रास्ते, दयानंद सरवदे, परशुराम जाधव, विजयकुमार नलवडे आदी उपस्थित होते.




 


Blogger द्वारे प्रायोजित.