संकेत टाइम्स दणका | डफळापूरात कॉपी बहादारांना रोक | सोमवारी दहावी केंद्रावर 'कॉपी विरोधी पथका'चा ठिय्या


डफळापूर,वार्ताहर : जत तालुक्यातील दहावी बोर्ड परिक्षेतील कॉप्या प्रकाराचा दैनिक संकेत टाइम्सने भांडाफोड केल्यानंतर सांगलीच्या कॉपी विरोधी पथक(स्कॉड)ने डफळापूर दहावी केंद्रावर सोमवारी भेट दिली.त्यात बातमीच्या दणक्याने सावध झालेल्या केंद्र प्रशासनाने सतर्कता बाळगल्याने सोमवारी पथकाला खाली हात परतावे लागले.पथक परत फिरताच तालुक्यातील सर्वच केंद्रावर जैसे थे परिस्थिती होते.जत तालुक्यातील दहावी बोर्ड परिक्षा केंद्रावर कॉपी मुक्त अभियान कागदपत्रीे दाखविले जात असल्याचे आरोप होत आहे. काही केंद्रसंचालकाचे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे.दरम्यान बिळूरसह अन्य काही केंद्रावर कॉपी प्रकरणावरून सतत गोधळ होत असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील केंद्रातील ब्लॉकमध्ये कॉप्याचा प्रकार आम्ही रोकण्यात यशस्वी आहोत.मात्र बाहेरून काही टवाळखोर तरूणांकडून कॉप्या टाकण्याचा प्रकार केला जात असल्याचे काही केंद्र संचालकांनी सांगितले. याबाबत पोलीसांनी बंदोबस्त कडक करावा अशीही मागणी केंद्र संचालकांनी केला.