Header Ads

जतेत 100 किलो प्लास्टिक जप्त | नगरपरिषेदच्या पथकाची कारवाई : प्रत्येकी 5 हाजाराचा दंड


 


जत,प्रतिनिधी : शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर जत नगरपरिषदेच्या भरारी पथकाने शहरातील चार दुकानावर छापा टाकत 100 किलो प्लास्टिक जप्त करत प्रत्येकी पाच हजार रूपयाचा दंड केला. मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.जगदंबा किराणा, बॉम्बे अग्रो एजन्सी जनरल स्टोअर्स, एस. एल बेकरी,राधा भवानी स्विट मार्ट या दुकाकानावर कारवाई करण्यात आली.

शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत जत नगरपरिषदेच्या वतीने संपूर्ण शहरात प्लास्टिक बंदी पूर्णपणे करण्यात आली आहे.तरीही शहरात बंदीनंतरही राजरोसपणे प्लॉस्टिकची विक्री केली जात होती.त्यामुळे बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

शनिवारी मुख्याधिकारी अभिजित हराळे व त्यांच्या विशेष भरारी पथकाने शहरातील प्रमुख बाजारपेठेच्या दुकानावर छापे टाकले.त्यात सुमारे 100 किलोच्यावर प्लास्टिक जप्त केले आहे. सदर प्लास्टिक बंदीची मोहीम राबवीत असताना बाजारपेठेतील प्रमुख दुकाने जसे की जगदंबा किराणा, बॉम्बे अग्रो एजन्सी जनरल स्टोअर्स, एस. एल बेकरी,राधा भवानी,इत्यादी दुकानांवर छापे टाकण्यात आले.त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. कारवाई दरम्यान जत शहरातील व्यापारी किरकोळ विक्रेते व विक्रेते भाजी विक्रेते यांना सिंगल यूज प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.जत शहर हे संपूर्ण प्लास्टिक मुक्त करायच्या उद्देशाने सर्व नागरिक, दुकानदारांनी किरकोळ विक्रेत्यांनी तसेच बाजारपेठेतील फळ व भाजी विक्रेते यांनी प्लास्टिक पिशवीचा उपयोग थांबवावा तसेच सिंगल प्लास्टिकचा वापर टाळावा,अन्यथा शासनाच्या कायद्यातील तरतुदीनुसार यापुढे कारवाई केली जाईल,असे मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी सांगितले.1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव साजरा होणार आहे.यानिमित्त स्वच्छ,सुंदर व हरीत महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी दिनांक 1 मार्च 2020 ते 30 एप्रिल 2020 या कालावधीत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हीरक महोत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी विशेष भरारी पथक नेमून ज्या ठिकाणी सिंगल इज प्लास्टिकचे व्यापारी विक्रेते आढळून आले.त्यांच्यावर 5 हजार रूपये दंडाची कारवाई केली.

यापुढे सिंगल इज प्लास्टिक आढळल्यास

प्रथम आढळल्यास 5 हजार, दुसऱ्यावेळा आढळल्यास 10 हजार रूपये व तिसऱ्यांदा आढळल्यास 25 हजार रूपये व तीन महिने करावास अशी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी,भाजी विक्रते,नागरिकांनी प्लास्टिक वापर टाळावा असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी केले.

 

 

जत शहरात नगरपरिषदेच्या भरारी पथकाने पकडलेले प्लास्टिक 

 


 

Blogger द्वारे प्रायोजित.