Header Ads

जत | सरकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचणार कधी?


 
 

जत,प्रतिनिधी : केंद्र व राज्य सरकार कडून शेतकऱ्यांच्या हितासाठी,शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध प्रकारच्या  योजना राबविल्या जातात.सरकारी योजना जाहीर केल्या जातात.एकीकडे या योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात.हजारो कोटी जाहिरातबाजीवर खर्च होऊन सुद्धा ज्या घटकांसाठी योजना असतात त्या घटकांपर्यंत योजनांचा प्रचार व प्रसार होत नसल्याचे चित्र आहे.अनेक विकासाच्या समाजहिताच्या तसेच वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चांगल्या योजना कागदावरच राहत असल्याचे चित्र दिसून येते.अनेक वेळा अनेक योजनांचा लाभ सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संलग्न असणाऱ्या गाव पुढाऱ्यांलाच होते.अनेक योजनांची माहिती खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत जातच नसल्यामुळे अनेक नागरिकांना शासनाच्या योजनेपासून वंचित असल्याचे दिसून येते.योजनांची पद्धत अलिप्त असल्याचे दिसून येते सर्वसाधारणपणे विकासाच्या केंद्र म्हणून शेतकरी,वंचित मागास समाज घटक असतो.या दोन्ही घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना व कार्यक्रम राबविले जातात.शेतकरी विकास संबंधितच्या योजना राबवण्यासाठी योजना कृषी विभागाची महत्त्वाची भूमिका असते. परंतु कृषी विभाग लागलेली निष्कर्षयतेची कीड इतक्या जोमात असते की,अनेक गावात कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक फिरकतही नाहीत. कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांनी आपापल्या नेमून दिलेल्या गावातील शेतकऱ्यांची सतत संपर्कात राहून शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे गरजेचे असते. तर अधिकाधिक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.मात्र असे होताना दिसत नाही.परंतु या महामार्गावर अनेक सरकारी चौकीदार अपेक्षित तेवढ्या प्रमाणात सज्जन नसतात. याउलट गावपुढारी व विविध राजकीय पक्षांच्या नेत्यासाठी झटत असल्याचे शेतकरी वर्गामध्ये बोलले जात आहे. कृषी विभागाचा विचार करता जिल्हा कृषी अधीक्षक तालुका, कृषी अधिकारी ,मंडळ अधिकारी अधिकार,कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक अशी एका प्रकारची भली मोठी संघटना असून मोठी संघटना असून  अनेक गावात यांचे काम समाधानकारकपणे दिसत नसल्याची चर्चा आहे. शासनाचे विविध योजनांवर हजारो कोटी रुपये खर्च केले जात असताना फायदा मात्र काही मूलभूत शेतकरी व पुढे करणारे शेतकरी यांना होताना दिसत आहे. हे अल्पभूधारक शेतकरी व गरीब शेतकरी अनेक योजनापासून वंचित राहतो.कृषी विभाग,समाज कल्याण विभागाच्या  अनेक योजना आहेत.या योजनांचा प्रचार व प्रसार शेवटच्या समाज घटकांपर्यंत सहजासहजी पोहचत नाही.शासनाच्य् योजनांचा लाभ घेण्यासाठी घेण्याचा कालावधी संपल्यानंतर योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचते. यामुळे अनेक अनेक योजनांचा लाभ घेता येत नाही. विशेष करून कृषी विभागाने फक्त शेतकरी हितासाठी योजना कागदावरच न ठेवता प्रत्यक्षात गावातील सरकारी योजनांपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणे गरजेचे आहे .
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.