Header Ads

कोरोना : जतेत बाहेरून आलेल्या 9,409 नागरिकांची नोंदणी | आमदार विक्रमसिंह सांवत यांची माहिती ; परदेशातून आलेले 21 जण निगरानीखाली


 


 

 

जत,प्रतिनिधी : जिल्ह्यात कोरोना बाधिताचा आकडा 24 इतका मोठा झाला आहे.आपणही इस्लामपूर पासून लांब नाही आहोत,कोरोनाला हलक्यावर घेऊ नका,स्व:तासह कुंटुबांची खबरदारी घ्या,असे आवाहन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.त्यांनी तालुक्यातील यंत्रणाचा आढावा घेतला.त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.

आ.सांवत म्हणाले,जत तालुक्यात परदेशातून 21 बाहेर राज्यातून 9409 लोक आले आहेत.परदेशातून आलेल्या नागरिकांची पुर्ण खबरदारी घेतली जात आहे.तर देशातील इतर भागातून आलेल्या नागरिकांपैंकी 8225 जणांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. बाकीची तपासणी सुरू आहे.अन्य काही लोक येतायं त्यांचीही माहिती घेतली जात आहे. तालुक्यात नव्याने रुजू झालेले प्रशिक्षित आयएएस अधिकारी अशिष येरेकर,प्रांताधिकारी प्रंशात आवटे,तहसीलदार सचिन पाटील,अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ,बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर व त्यांची टीम सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

आ.सांवत म्हणाले,आपला तालुका सध्या कोरोनाच्या तिसऱ्या टप्यात आहे.त्यामुळे संसर्ग,व नवीन रुग्ण याबाबत आपण नियत्रंणात आहोत.तालुक्यात कोरोनाचा कोणताही रूग्ण नाही.सर्व प्रकारे उपाययोजना सुरू आहेत.सर्वांनी सहकार्य करून कोरोना विरूधातील ही लढाई जिंकायची आहे,असेही शेवटी आ.सांवत यांनी आवाहन केले.

 

 
 
   ReplyForwardBlogger द्वारे प्रायोजित.