Header Ads

जत | दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या एकास अटक | जत पोलीसाची कारवाई,झटापडीत एक पोलीस जखमी : चारजण फरारी





 

जत,प्रतिनिधी : जत शहरात मध्यरात्री दरोड्याच्या तयारी असताना रात्रीच्या गस्त पथकाला चार ते पाच सराईत गुन्हेगारी आढळून आले.दरम्यान पथकाने पाटलाग गेला असता दरोडेखोराने पोलिसावर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला.त्यात एकाला पकडण्यात पोलीसांना यश आले.तर चार जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.यात झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला.
मोहन मच्छिद्र चव्हाण (वय 31 रा. पारधीतांडा जत)असे अटक केलेल्या संशयित दरोडेखोराचे नाव आहे.याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,बुधवारी मध्यरात्री जत पोलीसाचे पथक गस्त घालत असताना संभाजी चौका दरम्यान पाच दरोडे खोराची टोळी संशास्पद हालचाली करताना आढळून आली.पोलीसांनी त्यांना हाटकले,मात्र तेथून ते पळू लागल्याने पोलीसांनी पाटलाग केला.त्यात चारजण पळून गेले.

मोहन मच्छिद्र चव्हाण याला पकडत असताना त्यांने पोलीस नाईक प्रविण पाटील यांच्यावर चाकूने हल्ला केला.तरीही पाटील व केरबा चव्हाण यांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले.मात्र यात पाटील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान दरोडेखोर मच्छिंद्र चव्हाण यांच्याकडून कटावणी,स्क्रू डायवर,चटणी,बँटरी असे साहित्य आढळून आले.अन्य फरारी चौघाचा शोध सुरू आहे.तो पोलीस रेकार्डवरील गुन्हेगार आहे.अन्य फरारी चार जणांचा शोध सुरू आहे.

 

 

जत शहरातील वाढत्या चोऱ्याच्या घटनाच्या पार्श्वभूमीवर पो.नि.रामदास शेळके यांनी मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकांच्या रडारवर रेकार्डवरील गुन्हेगार आहेत.रात्रभर हे गस्तपथक शहर व तालुक्यात गस्त घालत आहे.पोलीसाच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.


 

 



 

Blogger द्वारे प्रायोजित.