जत | पतसंस्था ठेवीदार हाबकले | संकेत टाइम्स बातमीचा परिणाम
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पतसंस्था ईडीच्या रडारवर असल्याची कुजबुज सुरु होताच.तालुक्यातील ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. तर संकेत टाइम्समधून वृत्त प्रसिद्ध होताच पतसंस्थेच्या एका चालकाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.त्याने अक्षरशःथयथयाट सुरू केला आहे.
जत तालुक्यात अल्पावधीतच कोट्यावधी रुपयांच्या ठेवी जमा केलेल्या व व संशयास्पदरित्या विकास केलेल्या पतसंस्था ईडीच्या रडारवर असल्याची कुजबुज सुरु आहे.काही पतसंस्थात भष्ट्राचार कसा चालतोय याविषयी वस्तुनिष्ठ वृत्त दैनिक संकेत टाइम्समध्ये प्रसिद्ध केले होते.त्यामुळे पतसंस्थात असणाऱ्या ठेवी सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.दरम्यान या बातमीमुळे तालुक्यातील एका संस्था चालकांचा चांगलाच जळफळाट झाला आहे.यांची तालुकाभर खमंग चर्चा सुरू आहे.
बातमीत खरेच तथ्य आहे काय?
पतसंस्थेच्या कामात नेमके काही काळेबेरे आहे काय? असा संशयही बळावला आहे. दरम्यान संकेत टाइम्सने वस्तूनिष्ठ बातमी छापल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकांनी या विषयाची तड लावावी अशा सुचनाही आमच्या प्रतिनिधीकडे मांडल्या.