| बेवनूर | बेवनूरमध्ये पती,मुलासह महिलेस मारहाण
बेवनूरमध्ये पती,मुलासह महिलेस मारहाण
जत,प्रतिनिधी : बेवनूर ता.जत येथील पाणी पाजण्याच्या कारणावरून संगिता तानाजी शिंदे यांच्यासह पती,मुलगा,मुलगीस नवनाथ विनायक शिंदे,महेश विनायक शिंदे,जयेश विनायक शिंदे यांना काठीने मारहाण करून जखमी केले.याप्रकरणी संगिता शिंदे यांनी जत पोलीसात तीघाविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,संगिता शिंदे व त्यांचे पती तानाजी,मुलगी प्रणाली,मुलगा प्रतिक यांना शेतात पाणी पाजण्याच्या कारणावरून संशयितांनी काठीने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अधिक तपास उपनिरिक्षक महेश मोहिते करत आहेत.