Header Ads

| जत | पंचायत समितीतील ठाण मांडलेल्या ठाणेदारांच्या बदल्या कधी ?


 





 


जत पंचायत समितीतील ठाण मांडलेल्या ठाणेदारांच्या बदल्या कधी ?


जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीत एकाच विभागात ठाण मांडलेल्या अधीक्षक, कक्ष अधिकारी, वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक अशा अनेक ठाणेदार कर्मचाऱ्यांची उचलबांगडी कधी होणार असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.काही मलई मिळवून देणा-या कर्मचा-यास हलविण्यास विरोध केला जात आहे.जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा ठिय्या मांडलेल्या कर्मचाऱ्यांना हटविण्याची मोहिम हाती घेतलीआहे.तशीच जत पंचायत समितीतील ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही घ्यावी अशी मागणी होत आहे.पंचायत समितीतील विविध विभागांत काही कर्मचारी एकाच टेबलवर अनेक दिवसांपासून काम करीत आहेत. विशेषत: वित्त, बांधकाम विभागात ठराविक कर्मचाऱ्यांची मक्तेदारी झाली आहे. काही सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचाही या कर्मचा-यांना आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांचे स्थान मजबूत झाले आहे. या ठाणेदारांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा गरज आहे.सर्वच विभागात कमी-अधिक प्रमाणात असे कर्मचारी आहेत. यापैकी बहुतांश कर्मचारी एकाच ठिकाणी अनेक दिवस संबंधित विभागात काम करीत असल्याने अडवणुकीचे धोरण अवलंबतात. सामान्य नागरिकांपासून ते ठराविक सदस्य सोडून अन्य सदस्यांना जुमानत नाहीत.काहीवेळा पदाधिकाऱ्यांनाही दिशाभूल करणारी उत्तरे देतात. किरकोळ कारणावरून फाईल अडवतात. यामुळे अनेक महिन्यांपासून कामे प्रलंबित आहेत. 






 


 

Blogger द्वारे प्रायोजित.