Header Ads

सिमावर्ती भागातील भेसळीचे दुध डफळापूर परिसरातील डेअऱ्यात | अन्नभेसळाच्या कारवाया नंतरही त्याच ठिकाणी दुधसंकलन केंद्रे सुरू


 


अथणी : जत तालुक्यातील दूध भेसळ करणार्‍यांवर अन्न भेसळच्या अधिकाऱ्यांने कारवाई केली आहे.डफळापूर परिसरातील अनेक डेअऱ्यावर अन्न भेसळच्या एका अधिकाऱ्यांने कागदपत्री कारवाया केल्यात खऱ्या मात्र त्याच दुध डेअऱ्या तेथेच पुन्हा सुरू आहेत.तेथे या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे पुन्हा भेसळ नव्हे विषासारखे दुध तयार करण्यात येत असल्याची चर्चा आहे.डफळापूर परिसरात सर्वाधिक भेसळ केलेले कर्नाटक सीमावर्ती भागातील दुध डेअरी व संकलन केंद्रावर येत आहे. यामागे अधिकार्‍यांचा यामागे हात आहे का, याविषयी नागरिकांतून उलटसुलट चर्चा सुरू आहे. अथणी तालुक्यात भेसळ दुधाचे प्रमाणात वाढ होत आहे. छापा पडतो भेसळखोर पुन्हा भेसळ करत आहेत.भेसळ दूध तयार करणारे दूध कोठे जाते, तेथील अधिकार्‍यांचा हात आहे का, भेसळ दूध जाते हे त्यांच्या निदर्शनास येऊनसुद्धा कारवाई का केली जात नाही, असे असंख्य प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. या उद्योगात अनेक जणांचा सहभागाची शंका व्यक्‍त केली जात आहे.भेसळ दुधामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भेसळ दूध करण्यास कच्चा माल कोण देतो, याचा शोध घेण्याची गरज आहेत. 


Blogger द्वारे प्रायोजित.