Header Ads

जत | शिवार कृषी प्रदर्शन दिशादर्शक ठरेल | माजी आ.विलासराव जगताप | जतेत चार दिवस भरणार भव्य शेतकरी मेळा


 
शिवार कृषी प्रदर्शन दिशादर्शक ठरेल

 

माजी आ.विलासराव जगताप : जतेत चार दिवस भरणार भव्य शेतकरी मेळा

 

जत,प्रतिनिधी : शिवार कृषी शेतकऱ्यांना दिशा दर्शक ठरेल,मात्र शेती क्षेत्रात संशोधन होत नाही.डाळींबावर येणाऱ्या तेल्या रोगावर संशोधकांना संशोधन झाले नाही,संशोधक काय करतात असा सवाल माजी आ.विलासराव जगताप यांनी केला

जत येथील पशू वैद्यकीय दवाखान्याच्या मैदानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी झाले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ.रवींद्र आरळी,जिल्हा अध्यक्ष महेश खराडे,अर्जुन सवदे,रमेश माळी उमाकांत माळी,शहाजी शिंदे,आदी उपस्थित होते.

जगताप पुढे म्हणाले,जत तालुका दुष्काळी असला तरी या परिसरातील शेतकरी प्रयोगशील आहे.दुष्काळावर मात करत या भागातील शेतकऱ्यांनी द्राक्ष आणि डाळींबाच्या बागा फुळविल्या आहेत.मात्र यावर पडणाऱ्या तेल्या रोगावर 20 वर्षात संशोधन झाले नाही. शेती बाबतीत शास्त्रज्ञ काय करतात,असा प्रश्न आहे.मात्र अशा प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान पोहचते हे प्रदर्शन दिशादर्शक ठरेल.तालुक्यातील शेतकऱ्यांनी यांचा लाभ घ्यावा.

जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले,आम्ही गेली सात वर्षे तासगाव येथे शिवार कृषी प्रदर्शन घेत आहोत. यावर्षी विटा आणि जत या ठिकाणी प्रथमच प्रदर्शन घेत आहोत.जत तालुक्यातील शेतकऱ्या पर्यंत नवीन पोहचिण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमानी रस्त्यावरील लढाई बरोबरच रचनात्मक काम करत आहेत.

स्वागत रमेश माळी यांनी केली प्रास्ताविक महेश जगताप यांनी केले कार्यक्रमाला विक्रम ढोणे,नाना शिंदे चंद्रकांत गुडोड्डगी,शिवाजीराव गडदे, दिनकर पतंगे,विक्रम ढोणे,सुरेश घागरे,शंकर गडग,पिंटू मोरे,आबा गावडे,महादेव हिंगमिरे,सुरेश घागरे,कॉ.हणमंत कोळी  

आदीसह व्यावसायिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जत येथे शिवार कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रंसगी माजी आ.विलासराव जगताप बाजूस महेश खराडे,डॉ.रवींद्र आरळी, अर्जुन सवदे,उमाकांत माळी,शहाजी शिंदे, रमेश माळी व अन्य
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.