Header Ads

जत | तहसील कार्यालयासमोर 6 रोजी 'जेलभरो आंदोलन'


 




जत तहसील कार्यालयासमोर 6 रोजी 'जेलभरो आंदोलन'
जत,(प्रतिनिधी): सांगली जिल्हा लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन (citu) च्यावतीने जत तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी 'जेलभरो आंदोलन' छेडण्यात येणार असल्याची माहिती कॉम्रेड हणमंत कोळी आणि कॉम्रेड मीना कोळी यांनी दिली आहे.या जेलभरो आंदोलनासाठी जत तालुक्यातील आशा व गट प्रवर्तक उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र आशा - गट प्रवर्तक फेडरेशनच्या आवाहनानुसार महिलांवर होणारे मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तक यांना मानधन वाढीबाबत शासनाकडून आश्वासन देण्यात आले आहे, मात्र त्याची अद्याप पूर्तता करण्यात आली नाही. सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात दिनांक 6 मार्च 2020 ला जत तहसील कार्यालया समोर निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व आशा वर्कर्स आणि गतप्रवर्तक यांनी  सकाळी ठीक 10 वाजता हजर रहावे, असे आवाहन कॉ.मिना कोळी (जि. अध्यक्ष) कॉ. हणमंत कोळी (जि. संघटक) यांनी केले आहे.



 


Blogger द्वारे प्रायोजित.