Header Ads

जत | तुकाराम महाराजांच्या उपक्रमास 251 हेल्मेट भेट


 




 

तुकाराम महाराजांच्या उपक्रमास 251 हेल्मेट भे

 

 

जत,प्रतिनिधी : पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब सातव-पाटील यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यात जत तालुक्यात राबविला जाणा-या मानव मित्र संघटना उपक्रमाला मदत म्हणून हार-तुरे यांचा डामडौल न करता 251 हेल्मेट भेट देण्याचा अनोखा उपक्रम सातव पाटील कुटुंबाने केला आहे.विधानसभा राष्ट्रवादी काॅग्रसचे पक्षप्रतोद आमदार 

अँड अशोक बापू पवार यांच्या हस्ते गोंधळेवाडी (ता जत) येथील श्रीसंत बागडेबाबा मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा यांच्याकडे ते सपूर्द केले.

वाघोली येथे उद्योगपती बाळासाहेब सातव-पाटील यांचे पुतणे ओंकार यांचा विवाह कार्यक्रम झाला.तुकाराम महाराज यानी जत तालुक्यात अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी मानव मित्र हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.या समाजोपयोगी उपक्रमाची माहिती विवाह कार्यक्रमात दिली.प्राणदूत म्हणून काम केले जाणार आहे.

आमदार अँड अशोक बापू पवार म्हणाले,"अपघातग्रस्तांना मदत करण्याचा उपक्रम पुणे सारख्या शहरांमध्ये माणसांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम मठाधिपती तुकाराम बाबा यांनी केले आहे. तुकाराम महाराजांचे कार्य कौतुकास्पद असून त्याचा आदर्श भविष्यामध्ये राज्यातील जनतेने घेणे गरजेचे आहे. या उपक्रमाचं कौतुक करतो." 

ह.भ.प तुकाराम महाराज म्हणाले," पुणे-अहमदनगर हे राष्ट्रीय महामार्गावरही अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.या महामार्गावर आमदार अँड अशोक बापू पवार यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याचा उपक्रम राबवावा." अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी बापूसाहेब सातव,वास्तुशास्त्रज्ञ सरिता लिंगायत, पुणे मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष संजय धुमाळ,उद्योगपती प्रदीप वालेकर,टिन्नु अवताडे, सुधीर शेळके, सामाजिक कार्यकर्ते मुनूभाई शहा, डॉ भारती.महानगरपालिकेचे माजी विरोध पक्ष नेता दत्ता साने,वारकरी संप्रदायचे संतमंडळी उपस्थित होते.

 

 

 

ह.भ.प तुकाराम महाराज यांनी वधु-वरांनाछ अपघातापासून संरक्षण करण्यासाठी हेल्मेट भेट दिले.

 

 




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.