Header Ads

गुगवाड, देवनाळ येथे मटका अड्ड्यांवर पोलिसांनी छापा

 

 

जत,प्रतिनिधी  : जत तालुक्यातील गुगवाड व देवनाळ येथे अनेक दिवसापासून राजरोसपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकून दोघा मटका बुकीवर कारवाई केली.याप्रकरणी देवनाळ येथील बाजीराव तमन्ना वाघमोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गुगवाड येथील छाप्यात मटका बुकी गंगापा कांबळे,मल्लिकार्जुन आदानी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.


जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवनाळ हद्दीत बाजीराव वाघमोडे मटका घेत असल्याचे पोलिसांना समजले होते. पोलिसांनी छापा टाकून वाघमोडे याच्याकडून 1 हजार 240 रुपये व इतर साहित्य जप्त केले आहे. गुगवाड येथे गंगाप्पा कांबळे याच्याकडे 3 हजार 320 रुपये जप्त केले. याप्रकरणी पोलिस प्रशांत खोत व महेश मुळीक यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. तपास पोलिस नाईक सचिन हाके करीत आहेत.बिळूर परिसरात मटका,दारू,गांज्या तस्करी राजरोसपणे सुरू आहे.येथे नेमलेले पोलीसांचे अर्थपुर्ण सहकार्य करत असल्याने अवैध धंदे बळावल्याचे आरोप होत आहे. गुगवाड येथे आंतरराष्ट्रीय मटका अड्डा चालविला जात असल्याची चर्चा आहे. कर्नाटकातील सीमावर्ती गावातील नागरिकांची या मटक्याच्या अड्ड्यावर वर्दळ असते.गेल्या अनेक महिन्यापासून दररोज चालणाऱ्या मटका अड्ड्यावर अखेर पोलीसांनी कारवाई केली आहे.कारवाई नंतरही पुन्हा अड्डा सुरू झाल्याची चर्चा आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.