Header Ads

जत | तालुक्यातील म्हैसाळ योजनेतून सर्व तलाव भरावेत | प्रकाश जमदाडे यांची मागणी

जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेतून सर्व तलाव भरावेत  



प्रकाश जमदाडे यांची मागण


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सर्व तलाव म्हैशाळ योजनेतून भरून द्यावेत अशी मागणी खा.संजयकाका पाटील यांच्याकडे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केली आहे. त्यांनी तसे निवेदन खा.पाटील यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
सन 1995 साली जत तालुक्यातील 21,400 हे क्षेत्र ओलीताखाली येऊन 16 लघुपाटबंधारे तलाव 2 मध्यम प्रकल्प भरून देणेची तरतूद करून म्हैशाळ योजनेत समावेश आहे.पंरतू राजकीय इच्छाशक्ती नसल्याने व मराठावाडा, विदर्भ अनुशेष निधीअभावी आजतागायत ही योजना पुर्ण झालेली नाही. पंरतू गेल्या 4-5 वर्षात खासदार संजयकाका पाटील व तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नाने या योजनेला गती आलेली आहे.उत्तरेला सनमडी पर्यंत तर दक्षिणेला बिळूर (केसराळ) तलावात पाणी आलेले आहे.उर्वरीत 48 वंचित व 17 अंशत वंचित असलेल्या गावासाठी खा.संजय (काका) पाटील यांनी अधिकाऱ्यांमार्फत तयार केलेली योजना कार्यान्वयीत करावी.जत तालुक्यात एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2019 पर्यंत फक्त 217 मि.मि इतका सरासरी पाऊस झाला आहे. तालुक्यामध्ये संख व दोड्डनाला मध्यम प्रकल्प,28 साठवण तलाव,78 पाझर तलाव,के.टी.वेअर व सिमेंट बंधारे इत्यादी भरून घेणे शक्य आहे. सध्या सर्व तलावातील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे. मे 2019 मध्ये बनाळी, तिप्पेहळ्ळी, शेगांव, वाळेखिंडी, मिरवाड, व जिरग्याळ येथील तलावा शेजारील शेतकऱ्यांनी काही पैसे पाटबंधारे कार्यालयाकडे भरले आहेत. पंरतू त्यावेळी त्यांना पाणी दिलेले नाही. आता कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज येथील शेतकऱ्यांची मागणी नाही. त्यामुळे आपण आता जर जत तालुक्यातील तलाव व बंधारे भरून दिले तर एप्रिल व मे मध्ये पाणी टंचाई भासणार नाही.तसेच यापूर्वी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल.एप्रिल व मे मध्ये प्रशासनावर ही पाणी टंचाईचा ताण येणार नाही. तरी कोणी मागणी केली किंवा कोणी पैसे भरले याचा विचार न करता प्रशासनाचा ताण कमी करणेसाठी व शेतक-यांसाठी म्हैशाळ योजना चालू करून जत तालुक्यात कॅनाल मार्फत व नैसर्गिक प्रवाहाने जिथपर्यंत म्हैशाळचे पाणी जावू शकते तिथपर्यत पाणी सोडून साठवण तलाव व बंधारे इत्यादी भरून देणेत यावेत,असे निवेदनात म्हटले आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.