Header Ads

| जत | बुलेरो पुलावरून कोसळून युवक ठार | जतच्या सेनिक नगरजवळीची घटना 


 

 

जत,प्रतिनिधी : जत - शेगाव महामार्गावर जतच्या सैनिकनगर नजिकच्या पुलावरून बुलेरो गाडी नाल्यात कोसळून 

गाडीखाली सापडल्याने शाळकरी युवक ठार झाला.प्रथमेस शिवाजी सांवत(वय 18,रा.शेगाव)असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. घटना शनिवारी चारच्या सुमारास घडली.याप्रकरणी जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसानी दिलेली माहिती अशी, शेगाव येथील शिवाजी सांवत हे कट्रन्स्कशनचा व्यवसाय करतात.त्यांना तीन मुले आहेत.त्यातील मोठा असणारा प्रथमेस जत येथील एसआरव्हीएम शाळेत बारावीच्या वर्षात शिकत होता.सध्या त्याचे बारावीचे पेपर सुरू आहेत.सोमवारी शेवटचा पेपर होता.परिक्षा काळात तो जत येथे अभ्यासासाठी खाजगी खोली घेऊन राहत होता.परिक्षा संपल्याने खोलीमधील साहित्य नेहण्यासाठी प्रथमेस एकटाच चारचाकी बुलेरो गाडी(एमएच 13,एसी 8395)घेऊन जतकडे येत होता.जत जवळच्या सैनिक नगरच्या नजिकच्या फुलावर प्रथमेसचा गाडीवरचा ताबा सुटला.गाडी थेट पुलावरून दहा फुट खाली नाल्यात कोसळली.त्यात प्रथमेस गाडीखाली गेल्याने त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.घटनेची माहिती मिळताच त्यांच्या वडीलांनी घटनास्थळी पोहचत त्याला रुग्णालयात आणले.मात्र तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.दरम्यान जत ग्रामीण रुग्णालयात प्रथमेसच्या आईचा आक्रोश ह्रदय पिटाळून टाकणारा होता.हुशार असणाऱ्या प्रथमेसच्या आकाली निधनाने सांवत कुंटुबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शवविच्छेदन करून मृत्तदेह ताब्यात देण्यात आला.रात्री 


त्याच्या मृत्तदेहावर शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. 


Blogger द्वारे प्रायोजित.