Header Ads

माडग्याळ | तरूणी आत्महत्या प्रकरण | अखेर दोघावर गुन्हा दाखल | जिल्हा पोलीस प्रमुखांचे आभार ; संजय कांबळे






जत,प्रतिनिधी : माडग्याळ ता.जत येथील कॉलेज तरूणी एकता विजय चंदनशिवे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अखेर बहिण भावाविरोधात उमदी पोलीसांनी गुन्हा दाखल केला.

बबलू उर्फ दत्ता शंकर कलाल,बहिण अमृत्ता निलेश कलाल दोघे रा.माडग्याळ असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.मयत एकताचा भाऊ राहूल राजू मलकनाथ रा.मुंबई यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,माडग्याळ येथे आजीकडे राहणारी एकता विजय चंदनशिवे हिचे संशयित बबलू उर्फ दत्ता शंकर कलाल यांच्यासोबत प्रेमसंबध होते. हे संबध बबलूची मावस बहिण अमृत्ता हिला मान्य नव्हते. तिने एकताला तु आमच्या समाजाची नाहीस,त्यामुळे हे लग्न होणार नाही.तु माझ्या भावाबरोबरचे संबध तोड म्हणून दबाव टाकला होता.त्या दबावातून एकताने आत्महत्या केल्याचे एकताच्या भाऊ राहूल मलकनाथ यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे,जातीवाचक शब्द वापरणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.संशयित दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक तपास डिवायएसपी दिलीप जगदाळे करत आहेत.

 

 

अखेर एकताला न्याय मिळाला.

 

मागासवर्गीय समाजातील असलेल्या एकतावर दबाव टाकून तिला अत्महत्येस प्रवृत्त केले.संशयितावर गुन्हा दाखल करण्यास पोलीसांनी हयगय केली.आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना वस्तूस्थिती सांगितली.त्यांनी तात्काळ आदेश देऊन गुन्हा दाखल करायाला लावला.जिल्हा पोलीस प्रमुखांचे आम्ही आभारी आहोत.अखेर एकताला न्याय मिळाला आहे.पोलीसांनी पुढील तपास योग्य करावा.

 

संजय कांबळे 

सांगली जिल्हाध्यक्ष, रिपाई महाराष्ट्र




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.