Header Ads

जत | कृषी विभागातील भष्ट्राचार प्रकरण अधिकाऱ्यांना महागात | शासकीय निधी हडपणाऱ्या अधिकार्‍यांना बडतर्फ करणार : अजित पवार


मुंबई : काम न करता शासकीय तिजोरीतून निधी लाटणार्‍या अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करून, त्यांना बडतर्फ करणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कृषी विभागाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा प्रश्‍न प्रश्‍नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. त्यावर अजित पवार बोलत होते.अधिकार्‍यांनी काम न करताच पैसे काढल्याचं फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत मान्य केले.त्यावर हा सरकारच्या तिजोरीवर डाका आहे, असे सांगत याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला दिले. त्यांच्या निर्देशानुसार या अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करून बडतर्फीची कारवाई केली जाईल,अशी घोषणा अजित पवार यांनी केली. जत तालुक्यातील कृषी विभागाच्या शेडनेट पॉलिहाऊस,नाला खोलीकरण व रुंदीकरण कामांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला होता.काम न करताच निधी काढण्यात आला होता. यासंबंधीचा तारांकित प्रश्‍न अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला.



 

 

शासकीय अधिकाऱ्यांना चपराक

 

जत तालुक्यातील जनतेच्या अज्ञानपणाचा फायदा घेत कृषीच्या अधिकाऱ्यांनी काम न करताच थेट निधी काढला होता.या विरोधात सलग तीन वर्षे मी आंदोलने केली.खर्च झालेला निधी शासनाच्या तिजोरीत आला.संबधित अधिकारी निलबिंतही झाले.मात्र पैशाच्या ताकतीवर पुन्हा ते सेवत दाखल झाले होते.माझा पाठपुरावा सुरूच होता.आज अखेर या प्रकरणाविरोधात विधानसभेत आवाज उठविल्यानंतर शासकीय निधी घरचा पैसा असल्या सारखा वापरणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषित केले.अनेक दिवसानंतर माझ्या आंदोलनाला पुर्णत: यश मिळाल्याचे,यापुढे असा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांला चपराख बसेल. 

 

विक्रम ढोणे, युवक नेते


Blogger द्वारे प्रायोजित.