Header Ads

डफळापूर | ग्रामपंचायतीवर कारवाई करणार ; बिडिओ धरणगुत्तीकर | थकीत ग्रामस्थाचे नावे झळकणार चौकात





डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ग्रामपंचायतीचे  घरपट्टी मार्च महिना संपत आला तरीही 30 टक्के झाल्याबद्दल बिडिओ धरणगुत्तीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.मार्च अखेर ही 100 टक्के न झाल्यास यांचा लेखी अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला जाईल,अशा शंब्दात पदाधिकारी, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांना सुनावले.मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर यांनी डफळापूर ग्रामपंचायतीला भेट दिली.घरपट्टी व विकास कामाचा आढावा घेतला.ग्रामपंचायतीची घरपट्टी वसूली समाधान कारक नसल्याबाबत तीव्र शंब्दात नाराजी व्यक्त केली.वसूलीसाठी पदाधिकारी सहकार्य करत नाहीत.आम्ही वारवांर ग्रामस्थांच्या घरी हेलपाटे घालूनही ग्रामस्थ घरपट्टी भरत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.कोणतेही सबब न सांगता मार्च अखेरपर्यत 100 टक्के वसूली झाली पाहिजे,अन्यथा कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवून दिला जाईल,असा इशारा धरणगुत्तीकर यांनी यावेळी दिला.यावेळी उपसंरपच प्रतापराव चव्हाण,ग्रा.प.सदस्य मुरलीधर शिंगे,ग्रामसेवक एस.एस.कोरे उपस्थित होते.   


 

थकबाकीदाराचे नावे चौकात झळकणार 

 

डफळापूरातील  मोठ्या थकबाकीदाराची यादी चौकात झळकविण्यात येणार आहे.त्याशिवाय गावातील घरपट्टी थकीत ग्रामस्थांचे नळकनेक्शन तोडण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक एस.एस.कोरे यांनी दिली.

 

डफळापूर ग्रामपंचायतीच्या कामाचा बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर यांनी भेट देऊन आढावा घेतला.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.