Header Ads

उमदी | मलकारसिध्द यात्रा कमिटी चेअरमनपदी संगिता सांवत


उमदी,वार्ताहर : उमदी ता.जत येथील ग्रामदैवत श्री.मलकारसिध्द देवाच्या यात्रा कमिटी चेअरमनपदी सौ.संगिता बाबुराव सांवत याची तर व्हा.चेअरमनपदी रेश्मा अमिन जकाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


आजचा पेपर पाहण्यासाठी येथे क्लिक करा


सरपंच वर्षा निवृत्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या.सालाबादप्रमाणे कर्नाटक व महाराष्ट्र सिमेवर असलेल्या व कोट्यवधीची खिलार जनावरांच्या खरेदी-विक्री ची उलाढाल होत असलेल्या उमदी ता.जत येथील ग्रामदैवत श्री.वीर मलकारसिद्ध देवाच्या यात्रा पदाधिकारी निवडीसाठी ग्रामपंचायत सभागृहात सरपंच वर्षा निवृत्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी याठिकाणी सर्वानुमते चेअरमनपदी सौ संगीता बाबुराव सावंत व्हॉ.चेअरमनपदी रेश्मा अमिन जकाते यांची निवड करण्यात आली.
यावेळी कॉंग्रेस नेते निवृत्ती शिंदे, उपसरपंच रमेश हळके,ग्रामविकास अधिकारी के.डी.नरळे,ग्रामपंचायत सदस्य मनोहर शिंदे,नामदेव सातपुते,फिरोज मुल्ला,नारायण ऐवळे,सिद्धप्पा पुजारी,ग्रामपंचायत सदस्या सौ.जयश्री चंद्रकांत नागणे,कलावंती तोरणे,विजया तांबट आदी सह सर्व ग्रामपंचायत सदस्य , पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


 

Blogger द्वारे प्रायोजित.