Header Ads

डफळापूर | देवाचा संग करायचा असेल तर संतांचा संग करणे आवश्यक


 




देवाचा संग करायचा असेल तर संतांचा संग करणे आवश्यक

 

डफळापूर, वार्ताहर : मनुष्याला जिवनामध्ये प्रपंच्याचा जिवाचा देवाचा आणी सर्वश्रेष्ठ साधुसंताचा असे चार संग प्राप्त होतात पहिला संग प्रपंच्याचा. त्यातुन मानव सुख घ्यायचा प्रयत्न करतो; परंतु कायस्वरुपी सुख मिळत नाही, संसाराच्या बऱ्याच गोष्टी खोट्या असतात, परंतु आपणास समजत नाहीत. दुसरा संग म्हणजे जिवाचा मानसाचा जिव हा चेतन आहे,जिवाला पंचकोषातुन प्रवास करावा लागतो,तिसरा संग म्हणजे देवाचा देवाजवळ मनुष्य जाण्याचा प्रयत्न करतो पण जाऊ शकत नाही. कारण देवाचे स्वरुप व रुप वेगळे आहे.चौथा साधुसंतांचा संग करुन जिवनामध्ये सदगुरु आले तर देवाचे खरं स्वरुप पहावयास मिळेल असे प्रतिपादन डफळापुर येथे आयोजित निरंकारी सत्संग सोहळ्यामध्ये प्राध्यापक सुरेश पोळ सांगली यांनी केले.

ते पुढे म्हणाले की,सत्संगामध्ये संत भेटतात ज्यांनी जाणीले भगवंत तया नाम बोलिजे संत. देवाचे खरे स्वरुप संत संगतीच्या माध्यमातून सदगुरु जिवनात आल्यानंतर समजते. गीता असो, कुराण असो किंवा बायबल असो. सर्वांचे मत देव एक आहे आणी तो निर्गुण निराकार आहे असे सांगितले आहे. प्रत्येक साधु संतांनी धर्म ग्रंथांमध्ये सर्वाचा देव एकच आहे  देवाची प्राप्ती सदगुरु जिवनामध्ये आल्यानंतर होते सदगुरु शिवाय परमार्थाला सुरुवात होत नाही असे सांगितले आहे.संत निरंकारी मिशन मध्ये समयाच्या सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज ब्रह्मज्ञानाद्वारे सर्व धर्म ग्रंथ शास्त्रानुसार त्या एका ईश्र्वराची ओळख करून देतात.जगामध्ये विश्वबंधुत्व प्रेम नम्रता शांती एकता निर्माण करुन सर्व मानव जातीला एकाच छताखाली आणण्याचे महान कार्य हे मिशन करीत आहे. म्हणुन सन 2012 मध्ये निरंकारी मिशनला युनो या जागतिक संघटनेने युनोच्या सामाजिक व आर्थिक परिषदेवर सल्लागार म्हणून नेमणुक केली आहे अशी ही मंडळाची एकत्वाची शिकवण आत्मसात करणे आवश्यक आहे असे सांगितले.मंच संचलन जालिंदर जाधव यांनी केले तर नियोजन स्थानिक मुखी यांचे मार्गदर्शनाखाली डफळापुर येथील भाविक भक्त तसेच सेवादल युनिट क्रमांक 1161 यांनी केले.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.