Header Ads

माडग्याळ | ग्रामपंचायतीस टाळे टोकले | पाणी टंचाईने ञस्त महिलांचा घागरीसह मोर्चा


 

माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ (ता. जत) येथील ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आज (ता.12)माडग्याळ ग्रामपंचायतीस टाळे ठोकत घागरी मोर्चा काढला. वारंवार नळ पाणीपुरवठ्याची मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीच दखल न घेतले गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयास टाळे ठोकले.

गाव भागातील वार्ड नंबर 2 मधील मस्जिद परिसर येथे ग्रामपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. याबाबत ग्रामपंचायतीस वेळोवेळी मागणी व निवेदन देऊनही ग्रामपंचायतीने दखल घेतलेली नाही,त्यामुळे ग्रामस्थांना 

पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत बोलताना पांडुरंग कांबळे म्हणाले की, ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी तक्रार करूनही सरपंच, ग्रामसेवक किंवा वार्डाचे सदस्य हे कोणतेच पाऊल उचलत नाहीत.त्यामुळे मश्जिद परिसरातील लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या दोन महिन्यापासून या परिसराला पाणी मिळालेले नाही. दोन वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतीकडे हे काम करावे अशी वारंवार मागणी करत आहोत.चौदाव्या वित्त आयोगातून या भागातील पाणीप्रश्‍न मिटवले जाईल असे सांगितले होते,मात्र काम अद्यापही झालेले नाही.

 पद्धतीने कोणतेच काम आज अखेर केलेले नाही. त्यामुळे आज वार्ड नंबर दोन मधील सर्व ग्रामस्थांनी रिकाम्या घागरी आणून ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजासमोर ठेवले. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, ग्रामसेवक अगर कोणतेच कर्मचारी हजर नसल्याने ग्रामस्थांनी कार्यालयास टाळे ठोकले.घागरीसह मोर्चा काढत कार्यालयासमोर ठिय्या मांडला.दरम्यान या परिसरातील काम तातडीने करू असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

 

 

माडग्याळ ता.जत येथील वार्ड नं.2 मधिल नागरिकांनी मोर्चा काढत ग्रा.प.कार्यालयास कुलप ठोकले. 

Blogger द्वारे प्रायोजित.