Header Ads

| सोन्याळ | शासनाची कर्जमुक्ती याद्या गावात | सोन्याळमध्ये नावे पाहण्यासाठी गर्दी 


 




 

शासनाची कर्जमुक्ती याद्या गावात

 

 

सोन्यामध्ये नावे पाहण्यासाठी गर्दी

 

 

 

 

सोन्याळ,वार्ताहर : महाराष्ट्र शासनाकडून महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शनिवारा जत तालुक्यात प्रत्येक गावागावात प्रसिद्ध करण्यात आली.  सोन्याळ येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि सर्वसेवा सोसायटी कार्यालयात नामफलकावर ही यादी लावण्यात आली आहे.आपले नाव आहे का पाहण्यासाठी  शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. सोन्याळ आणि लकडेवाडी येथील यादीचे ग्रामपंचायत कार्यालय,आणि सोन्याळ सर्व सेवा सोसायटी येथे शेतकऱ्यांच्या महितीस्तव नामफलकवर लावण्यात आली.

सोन्याळ जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील सोन्याळचे 310 आणि जाडरबोबलादचे 284 शेतकरी या पहिल्या यादीत पात्र ठरले आहेत. यावेळी डिसीसी बँकेचे संतोष कुंभार साहेब,आर बी कोळी, सेक्रेटरी विश्वनाथ हिटनळी, लखन होनमोरे, राजकुमार काळे, जितेंद्र अंकलगी, ग्रामपंचायत क्लार्क अशोक ऐवाळे, सोसायटीचे वशीम नदाफ, बिरु पुजारी व  कोतवाल संतोष परीट आदी उपस्थित होते.राज्यामध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमुळे आचारसंहितेच्या संभ्रमामुळे नियोजित वेळेत जाहीर होऊ शकल्या नाहीत.याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. कुठल्याही परिस्थितीत यादी जाहीर करण्यासाठी  सहकार विभागासह संबंधित यंत्रणांची शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसाची सुटी रद्द करण्यात आली असल्याचे समजते.राज्यात अनेक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने सहकार विभागाला पत्र देऊन निवडणुका असलेल्या गावांत आणि जिल्ह्यात  या पत्रामुळे प्रसिध्द केल्या जाणाऱ्या लाभार्थी याद्याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.अखेर आज याद्या प्रसिद्ध झाल्याने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.

 

सोन्याळ : जिल्हा बँकेचे संतोष कुंभार आणि सहकाऱ्यांनी सोन्याळ ग्रामपंचायत कार्यालयात कर्जमुक्ती जाहीर करून  नामफलकावर लावताना




 


Blogger द्वारे प्रायोजित.