Header Ads

'करोना'यंत्रणा सज्ज आहेत,खबरदारी घ्या : आ.विक्रमसिंह सांवत | जतेत घेतली आढावा बैठक


 

जत,प्रतिनिधी : करोना यंत्रणा रोकण्यासाठी तालुक्यातील सर्व यंत्रणानी सतर्क राहून काम करावे.

देशात आणि महाराष्ट्रात कोरानोला रोखण्याची सर्व खबरदारी केंद्र व राज्य सरकारने घेतली आहे.राज्य सरकार या संसर्गजन्य आजाराबाबत गांभिर्याने काम करत आहे.त्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील आरोग्य यंत्रणेंने सर्व प्रकारे सज्ज रहावे.हा तालुका सीमावर्ती भागात असल्याने येथे यंत्रणेने दक्ष राहण्यात जराही कुचराई करू नये,असे सांगून कोरानो बाबत जनतेनीही सहकार्य करावे, खबरदारी घ्यावी पण भीती बाळगू नये असे आवाहन जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले.कोरोनोचा महाराष्ट्रातही फैलाव होत असल्याने आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आपल्या जत विधानसभा क्षेत्राचा रविवारी आढावा घेतला.या बैठकीला प्रांताधिकारी प्रशांत आवटे,तहसीलदार सचिन पाटील,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर,जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे,गटशिक्षाधिकारी आर.डी.शिंदे,आप्पाराया बिराजदार, महादेव पाटील,सुजयनाना शिंदे,संतोष भोसले यांच्यासह पदाधिकारी

उपस्थित होते.

आ.सावंत म्हणाले, जत तालुका विस्ताराने मोठा आहे.या तालुक्यातील अनेक गावातील लोक देशाच्या वेगवेगळ्या भागात कामानिमित्त आहेत.गिरगावसारख्या गावातील एक हजाराहून अधिक लोक केरळ राज्यात आहेत.केरळमध्ये कोरोनाचा फैलाव जोरात असल्याने या राज्यासह बाहेर असणारे लोक आपल्या गावी परत येत आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांची तपासणी करणे तसेच योग्य ती खबरदारी प्रशासनाने घ्यावी.तसेच हा तालुका कर्नाटक राज्याला लागून असल्याने

सीमावर्ती भागात आरोग्य यंत्रणा सक्षमपणे कार्यरत करा.तालुक्यात कुठेही संशय वाटला तर तिथे तातडीने उपाययोजना राबवल्या गेल्या पाहीजेत. वास्तविक या आजाराचा मुकाबला करण्याची जबाबदारी सामुहीक आहे. लोकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. शासन आणि प्रशासन आपल्या सोबत आहे.दरम्यान,जत शहरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे.पालिकेने याकडे

गांभीर्याने पाहयला हवे. जत शहरातील गटर स्वच्छ करण्यापासून कचरा उचलणे आणि प्रभागाची स्वच्छता याकडे गांभिर्याने लक्ष क्या असे आदेश मुख्याधिकारी हराळे यांना दिले.जत तालुक्यात एकही रूग्ण नाही ; जत तालुक्यात एकही कोरोनाचा रूग्ण नाही. तीन लोक परदेशातून आले होते. त्यातील एकाला निमोनीया असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्याच्यावर मिरज रूग्णालयात उपचार सुरू आहेत.एक कर्नाटक सीमेवरचा आहे.तेथील प्रशासनाला कळवण्यात आले आहे.तालुक्यात यात्रा, जत्रा,गर्दी,मेळावे यावर बंदी घातली आहे. तसेच आरोग्य विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना आपापली मुख्यालये सोडू नयेत असे आदेश देण्यात आले आहेत,असे प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी सांगितले.

 

 

जत येथील कोरोना संदर्भातील बैठकीत बोलताना आ.विक्रमसिंह सांवत

 

Blogger द्वारे प्रायोजित.