Header Ads

'कोरोना' आठवडा बाजारात काळजी घेण्याची गरज






 

 

जत,प्रतिनिधी : कोरोना या विषाणू जन्य रोगाची धास्ती संपूर्ण जगाने घेतली असून जत शहरात कोरोनाच्या भितीने भाजी विक्रेते व व्यापारी तोंडाला मास्क लाऊन व्यापार करताना दिसू लागले आहेत. 

कोरोना या विषाणू जन्य रोगाने जगव्याप्त केले आहे.जगातील एकशे चाळीसहुन अधिक देशात कोरोना या विषाणू जन्य रोगाने थैमान घातले आहे. अमेरिका सारख्या बलाढ्य देशाने तर या आजाराचा आपल्या देशात मोठ्या प्रमाणात फेलाव होऊ नये यासाठी देशात आणीबाणी जाहीर केली आहे.आपल्या देशातही आजपर्यंत एकशे आठ लोकांना कोरोना या विषाणू जन्य रोगाने गाठले आहे.सर्वात जास्त कोरोनाचे रोगी हे महाराष्ट्र राज्यात आढळून आले आहेत. त्या रूग्णांची संख्या ही 32 इतकी असून. प्रशासनाने वतीने कोरोनाबाधित व कोरोना संशयित रूग्णांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी व दक्षता घेतली जात आहे.त्यांच्यासाठी जिल्हास्तरावर कोरोना विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.कोरोना संशयित रूग्णांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.तसेच या विषाणू जन्य रोगाचा फैलाव राज्यभर होऊ नये यासाठी राज्य सरकारने राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे,नाट्यगृहे, जिम व माॅलस दिनांक 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सांगली जिल्ह्यातीलही सर्व जिल्हा परिषद, माध्यमिक, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असले तरी राज्य सरकारने आठवडी बाजाराबाबत अजून कोणताच निर्णय घेतला नाही कारण आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात बाहेरील राज्यातून व्यापारी व्यापारासाठी आलेले असतात. तसेच बाजारासाठी मोठ्या प्रमाणात अबाल वृदधही खरेदीसाठी आलेले असतात. अशामध्ये कोरोनाबाधित किंवा कोरोना संशयित व्यक्ती बाजारात फिरू लागला तर त्याच्यात असलेल्या कोरोना विषाणूची बाधा बाजारकरांना होऊ शकते त्या मुळे प्रशासनाने आठवडी बाजाराबाबत ही योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोना साथीच्या भितीने प्रशासनाने आपल्या कर्मचारी यांच्यासाठी बायोमॅट्रीक पद्धत तात्पुरती स्थगीत केली आहे. परंतु राज्यातील सर्वच नोंदणी विभागांतर्गत असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात घर,जमीन, जागा, खरेदी विक्री व्यवहार करते वेळी थंब पद्धत अवलंबली जाते. यावेळी अनेक लोकांच्या अंगठ्याचे ठसे घेतले जातात. अशावेळी कोरोना बाधित किंवा कोरोना संशयित व्यक्ती खरेदी विक्री व्यवहारासाठी येऊन त्याने अंगठ्याचा वापर केला तर त्याच्यातून अन्य लोकांना या विषाणू जन्य रोगाची बाधा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रशासनाने यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.एकंदरीत कोरोना या विषाणू जन्य रोगाने सर्वांना भयभीत करून सोडले असून या रोगाच्या भितीमुळे मेडिकल दुकानामध्ये सॅनिटराइजचे साहीत्य मिळेना झाले आहे. तसेच जो तो तोंडाला लावण्याचे मास्क मागताना दिसत आहे. इतका धसका या कोरोनाचा सर्वसामान्य नागरिकानी घेतला आहे.




 


Blogger द्वारे प्रायोजित.